Bakri Eid 2020: ईदच्या दिवशी तालिबान करणार अफगान सरकारच्या 5,000  कैद्यांची सुटका
Grenade Attack (Representational Image/ Photo Credit: Getty)

यंदाची बकरी ईद (Bakri Eid 2020) अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या ताब्यात असलेल्या कैद्यांसाठी नवा किरण घेऊन येणार असे दिसते. यंदाच्या बकरी ईद दिवशी तालिबान (Taliban) अफगान सरकारच्या सुमारे 5,000 कैद्यांची सुटका करणार आहे. तालीबानने अफगान सरकारचे कैदी (Afghan Government Prisoners) म्हणून गेल्या प्रदीर्घ काळात अनेक नागरिकांना बंदी बनविले आहे. अफगान सरकार (Afghan Government) आणि तालिबान यांच्यात झालेल्या करारानुसार या कद्यांना सोडण्यात येणार आहे, असे वृत्त टोलो न्यूजच्या हवाल्याने आयएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

तालिबानचा कतर येथील प्रवक्ता सुहेल महेन याने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले आहे की, तालीबानने आपल्याकडे असलेल्या सर्व अफगान सरकारच्या कैद्यांना एक सद्भावना संदेश म्हणून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये बोलणी झाली आहेत. त्यानुसार 5,000 कैद्यांची सुटका करण्यात येईल.

तालिबान आणि अफगान सरकार यांच्यात दोहा येथे झालेल्या यूएस-तालिबान शांततार करारानुसार अफगान सरकार 5,000 तालिबान सदस्यांना मुक्त करेन. यात 4,400 तालिबानींना या आधीच मुक्त करण्यात आले आहे. (हेही वाचा, Happy Bakrid 2020 Messages: बकरीदच्या शुभेच्छा Wishes, Quotes, Greetings च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरं करा कुर्बानी ईद चं पर्व)

दरम्यान, उभय पक्षाच्या समझोत्यानुसार तालिबान 1,000 अफगान कैद्यांची सुटका करेन. आतापर्यंत 800 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. कैदी हस्तांतरण विश्वास निर्मितीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून अंतर-अफगान संवाद सुरु करण्यात आला आहे. त्यातूनह कैद्यांची सुटका करण्याबाबतचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. ईद अल-अधा निमित्त तालिबानने मंगळवारी रात्री युद्धविरामाची घोषणा केली.