
Eid-al-Adha 2020 Wishes and Messages: इस्लाम धर्मियांच्या 3 प्रमुख ईद पैकी बकरीद यंदा भारतामध्ये 1 ऑगस्ट दिवशी साजरी केली जाणार आहे. मुस्लीम बांधव हा सण ईद-उल-अजहा (Eid-al-Adha)म्हणून देखील साजरा करतात. या ईदला बकर्याची कुर्बानी दिली जात असल्याने कुर्बानी ईद (Qurbani Eid)म्हणून देखील ती ओळखली जाते. भारतासह जगभरात सध्या कोरोना व्हायरस संकट घोंघावत असल्याने या सणाची मज्जा दरवर्षीप्रमाणे घेणं शक्य नाही. परंतू सोशल मीडियाच्या माध्यामातून व्हर्च्युअली तुम्ही प्रियजणांना, नातेवाईकांना, मुस्लिम मित्र-मैत्रिणींना बकरीद मुबारक शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करू शकता. त्यासाठी लेटेस्टली टीमकडून बनवण्यात आलेली शुभेच्छापत्र, मेसेजेस, विशेस, HD Images, Wallpapers, GIFs तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर वर शेअर करू शकता.
मुस्लिम बांधव बकरीद दिवशी मशिदीमध्ये नमाज अदा करतात. इस्लामिक मान्यतांनुसार, कुर्बानी देण्याची परंपरा पैगंबर हजरत इब्राहिम द्वारा सुरू झाली. या ईदला कुर्बानीचा सण देखील म्हटलं जातं. या सणाला देवाकडे तुमच्या सगळ्यात आवडत्या वस्तूची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.
बकरीद मुबारक

दीपक में अगर नूर न होता,
तन्हा दिल यूं मजबूर न होता,
हम आपको 'ईद मुबारक' कहने जरूर आते,
अगर आपका घर इतना दूर न होता.
बकरीद मुबारक!

सदा हंसते रहो जैसे हंसते हैं फूल,
दुनिया के सारे गम तुम जाओ भूल,
चारों तरफ फैलाओ खुशियों के गीत,
इसी उम्मीद के साथ तुम्हें मुबारक हो बकरीद!
बकरीद मुबारक!

जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो,
आपका हर दिन ईद के दिन से कम न हो,
ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो,
जिसमें कोई दुःख और कोई गम न हो.
बकरीद मुबारक

बकरी ईदच्या तुम्हा सार्यांना खूप खूप शुभेच्छा!

बकरीद व्हॉट्सअॅप स्टिकरर्स
बकरीदच्या शुभेच्छा देण्यासाठी या ग्रीटिंग्स सोबतच व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर देखील व्हॉट्सअॅप स्टिकर्स आहेत. त्याच्या माधयमातूनही शुभेच्छा दिल्या जातात. Anroid युजर्स गूगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन बकरीद च्या शुभेच्छा देण्यासाठी खास स्टिकर पॅक डाऊनलोड करू शकतात.
भारतामध्ये कोरोना संकटाचा धोका पाहता आता सण साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रिय लोकांना यंदा गळाभेट देत बकरीदच्या शुभेच्छा देता येत नसतील तरीही सोशल मीडीयातून या सणाचा आनंद द्विगुणित करा. तुम्हा सार्यांना बकरीदच्या खूप सार्या शुभेच्छ!