(Photo Credit: X)

बहामासमधील (Bahamas Ferry Sinks) ब्लू लॅगून आयलँडजवळ एक बोट पाण्यात बुडाल्याने 75 वर्षीय महिलेचा करुण अंत झाला. समुद्रात विहारासाठी गेलेले हे जहाज मोठ्या लाटांमध्ये अडकले. लाटांचा तडाखा सहन न करु शकल्याने हे जहाज पाण्यातच उलटले. परिणामी डबल डेकर असलेल्या या जहाजाला जलसमाधी मिळाली. वृद्ध महिलेसोबत जहाजावर असलेले इतर दोन व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. ते अत्यावस्थ असतानाच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जहाज समुद्रात बुडत असतानाच एक व्हिडिओही सोसळ मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहाला मिळते की, एक डबल डेकर बोट समुद्रात बुडत आहे. ही बोट पाण्यात बुडत असताना जवळून जात असलेल्या दुसऱ्या एका बोटीतील प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित केला आहे. ज्यामध्ये या बोटीतील प्रवासी आरडाओरडा करताना दिसत आहे. दरम्यान, बुडणाऱ्या बोटीतील लोकांना वाचविण्यासाठी या बोटीवरील काही लोकांनी लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षीत साधने वापरुन उड्या घेतल्या. त्यामुळे बोटीवरील दोघांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले खरे. मात्र, त्यांना बोटीतल वृद्ध महिलेला मात्र वाचवता आले नाही.

व्हिडिओ

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रॉयल बहामास पोलिस दलाला मंगळवारी सकाळी 11 वाजता ET च्या काही वेळापूर्वी बुडणार्‍या डबल-डेक कॅटामरॅनबद्दल एक कॉल आला. त्या कॉलला तात्काळ प्रतिसाद देत, पोलिसांनी मरीन सपोर्ट आणि रॉयल बहामास डिफेन्स फोर्सच्या युनिट्सनी बचाव कार्यात मदत केली. प्रवासी आणि क्रू यांना "बुडत्या जहाजातून" वाचवले. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पोलिस मरीन सपोर्ट आणि रॉयल बहामा डिफेन्स फोर्सच्या तुकड्या तातडीने पोहोचल्या आणि बुडणाऱ्या जहाजातून प्रवासी आणि क्रू सदस्यांना वाचवण्यात मदत केली.