Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

Iraq: इराकच्या मोसुल (Mosul) शहरात तीन Private Part असणाऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाचं अशी घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या विचित्र शारीरिक विकृतीनंतर डॉक्टर हैराण झाले आहेत. या विकृतीला वैद्यकीय भाषेत ट्रिपहेलिया (Triphallia) असं म्हणतात. अहवालानुसार, इराकच्या मोसूल शहरात जन्मलेल्या तीन महिन्यांच्या मुलाला त्याच्या खाजगी जागेवर सूज आल्याची तक्रार त्याच्या पालकांनी डॉक्टरकडे केली. त्यावेळी ही बाब उघडकीस आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इराकमध्ये वैद्यकीय शास्त्राची ही पहिली घटना घडली आहे.

अहवालानुसार, इराकच्या मोसूल शहरात जन्मलेल्या तीन महिन्यांच्या मुलाला त्याच्या खाजगी भागात सूज आल्याची तक्रार डॉक्टरकडे आली असता, ही बाब उघडकीस आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इराकमध्ये वैद्यकीय शास्त्रातील ही पहिली घटना आहे. डॉक्टरांनी तपासणीत या मुलाला आणखी दोन लिंग उदयास येत असल्याचं दिसून आलं. तसेच दुसरे लिंग अंडकोषाखाली स्थित आहे. (वाचा - भारताचा दिलदारपणा! पाकिस्तानी मुलाने नकळत ओलांडली सीमा; BSF जवानांनी चॉकलेट देऊन पाठवलं मायदेशी)

डॉक्टरांनी हे दुर्मिळ प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. या मुलाच्या कौटुंबिक इतिहासामध्ये कोणालाही अशा स्वरुपाची अनुवांशिक समस्या उद्भवलेली नाही. डॉ. शाकिर सलीम जाबली आणि आयद अहमद मोहम्मद यांनी यासंदर्भात इंटरनेशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये माहिती दिली आहे. त्यावर संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभ्यासानुसार, ही समस्या 50-60 लाख मुलांपैकी एकाला उद्भवते.

दरम्यान, या प्रकरणात डॉक्टरांना असं आढळलं की, पुरुषाच्या अतिरिक्त जननेंद्रियात मूत्रमार्ग नसतो. म्हणून ऑपरेशनद्वारे ते काढले जाऊ शकतात. डेली मेलच्या वृत्तानुसार 2015 मध्येही अशीच एक घटना समोर आली होती. भारतात जन्मलेल्या या मुलाला तीन लिंग होते. मात्र, याची नोंद वैद्यकीय जर्नलमध्ये करण्यात आली नव्हती.