काय सांगता? 40 वर्षांनी Prince Charles आणि Lady Diana यांच्या लग्नातील Cake चा लिलाव; केकच्या तुकड्याला मिळाली 2 लाख किंमत
Prince Charles आणि Lady Diana यांच्या लग्नातील Cake (संग्रहित संपादित प्रतिमा)

इंग्लंडची राजकुमारी डायना (Lady Diana) हिच्या मृत्यूनंतर अजूनही तिचे चाहते तिची आठवण काढत असतात. अजूनही तिचे फोटोज, व्हिडिओज सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. आता एक बातमी समोर आली आहे, त्यानुसार प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) आणि राजकुमारी डायना यांच्या लग्नाच्या केकच्या एका तुकड्याचा तब्बल 1,850 पाउंडमध्ये लिलाव झाला आहे. जर आपण भारतीय चलनात ही रक्कम मोजली तर, या केकची किंमत सुमारे 1,90,585 रुपये होत आहे. अशाप्रकारे लग्नाला 40 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही, केकचा तुकडा एका लिलावात इतक्या मोठ्या किंमतीत विकला गेला आहे.

हा केकचा तुकडा ब्रिटिश शाही जोडप्याने त्यांच्या लग्नात खाऊ घातलेल्या 23 अधिकृत विवाह केकपैकी एक आहे. केक आयसिंग (केकच्या सजावटीचे मिश्रण) आणि बदामाच्या मिठाईंनी बनवलेल्या बेसमध्ये शाही 'कोट ऑफ आर्म्स'सह सजवला होता. हा तुकडा क्वीन मदर्स स्टाफच्या सदस्य मोया स्मिथला देण्यात आला होता. त्यांनी तो Cling Film द्वारे जतन करून ठेवला होता. या केकवर 29 जुलै 1981 अशी तारीख आहे.

बीबीसीने बुधवारी वृत्त दिले की स्मिथने एका जुन्या केकच्या टिनमध्ये हे आयसिंग ठेवले होते आणि त्याच्या झाकणाने हाताने तयार केलेले लेबल चिकटवले होते. यावर लिहिले होते- 'काळजीपूर्वक स्पर्श करा - प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या लग्नाचा केक.' त्यांच्या कुटुंबाने हा केक एका संग्राहकाला 2008 मध्ये विकला होता. जगभरातील लोकांनी बोलीत भाग घेतला आणि केकचा तुकडा बुधवारी Gerry Laytonला विकला गेला. (हेही वाचा: UK कडून भारतीय प्रवाशांवरील निर्बंधांमध्ये शिथिलता; लसीकरण पूर्ण झालेल्यांना 10 दिवस सक्तीच्या हॉटेल क्वारंटीन मधून मुभा)

केकच्या या तुकड्याला साधारण 500 पाउंड मिळणे अपेक्षित होते, परंतु लिलावात त्याला भली मोठी रक्कम मिळाली. Laytonने सांगितले,की, त्याच्या मृत्यूनंतर हा केकेचा धर्मादाय संस्थेला दान केला जावा. दरम्यान, प्रिन्स चार्ल्सने 29 जुलै 1981 रोजी लेडी डायना स्पेन्सरशी सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये लग्न केले. चार्ल्स आणि डायना 1992 मध्ये 11 वर्षांनी विभक्त झाले आणि 1996 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 1997 मध्ये पॅरिसमध्ये एका भीषण कार अपघातात डायनाचा मृत्यू झाला.