टांझानियामध्ये (Tanzania) एका चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकारी याबद्दल पुष्टी केली आहे. दरम्यान, किलिमंजारो पर्वताच्या उतारावर मोशीजवळील स्टेडियमवर शेकडो लोक जमले होते. यावेळी, लोकांमध्ये पवित्र तेलापासून अभिषेक घालण्याची स्पर्धा होती. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.
रॉयटर्स वृत्तसंस्थने दिलेल्या वृत्तानुसार, मोशीचे जिल्हा आयुक्त किप्पी वारिओबा यांनी सांगितले की, या घटनेत तब्बल 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 लोक जखमी झाले आहेत. मृत पावलेल्यांमध्ये 5 मुले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुरक्षा पोलिसांना या घटनेची माहिती त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, असंही वारिओबा यांनी सांगितलं. (हेही वाचा - Coronavirus: वुहान शहरातून एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून 323 भारतीय दिल्लीमध्ये दाखल)
पवित्र तेल घेण्यासाठी लोकांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे येथे मोठी चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चर्चमध्ये देण्यात येणाऱ्या तेलामुळे घरात समृद्धी येते, असं म्हटलं जातं. त्यामुळे विविध शहरातून लाखो भाविकांनी याठिकाणी गर्दी केली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली.