Roof Collapse At Serbian Railway Station: उत्तर सर्बिया (Northern Serbia) मध्ये शुक्रवारी नोव्ही सॅड रेल्वे स्टेशन (Novi Sad Train Station) चे काँक्रीटचे छत कोसळून (Roof Collapse) किमान 14 जणांचा मृत्यू झाला. अनेक जखमी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. आपत्कालीन कर्मचारी छताखाली गाडले गेलेल्यांचा शोध घेत आहेत. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक आणि गृहमंत्री इविका डॅकिक यांनी अपघाताचे कारण तपासणार असल्याचं म्हटलं आहे.
गृहमंत्री इविका डॅकिक यांनी पुष्टी केली की, किमान 14 लोकांचा मृत्यू झाला. तसेच तीन गंभीर जखमींना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शोधकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. घटनास्थळावर 80 बचावकर्ते मलबे हटवण्याचे काम करत आहेत. मृतांमध्ये 6 वर्षांची मुलगी आणि उत्तर मॅसेडोनियाच्या नागरिकाचा समावेश आहे. (हेही वाचा -Blast in Balochistan: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात स्फोट, 5 शाळकरी मुलांसह 7 जण ठार)
या दुर्घटनेनंतर दोन स्थानकांच्या दुरुस्तीमुळे सार्वजनिक रोष निर्माण झाला आहे. टीकाकारांनी सरकारवर दुर्लक्ष आणि खराब देखभाल केल्याचा आरोप केला आहे आणि विरोधी गट उत्तरे मागण्यासाठी स्टेशनवर निषेधाचे नियोजन करत आहेत. अध्यक्ष वुकिक यांनी स्पष्ट केले की, रेल्वे स्टेशनचे छप्पर हे आजच्या नूतनीकरणाचा भाग नाही. (हेही वाचा -Steel Plant Explosion In Central Mexico: मेक्सिकोच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; 12 जणांचा मृत्यू, एक जखमी)
सर्बियन रेल्वे स्थानकावरील छत कोसळतानाचा व्हिडिओ -
BREAKING: A roof collapsed at the Novi Sad railway station in Serbia, killing 8 and injuring over 30.
This just confirms Hanke’s School Boys Theory of History: It’s just one damn thing after another.pic.twitter.com/6uIkqBL8Mt
— Steve Hanke (@steve_hanke) November 1, 2024
दरम्यान, पंतप्रधान मिलोस वुसेविक यांनी सांगितले की मूळतः 1964 मध्ये बांधलेली छत अलीकडील सुधारणांदरम्यान बदलली गेली नाही. नोव्ही सॅडच्या रहिवाशांनी मेणबत्त्या पेटवून या घटनेप्रती शोक व्यक्त केला. तसेच सरकारने शनिवारी हा शोक दिवस घोषित केला.