China: चीनमध्ये रुग्णालयात सशस्त्र हल्ला, एका संशयीताला अटक; 2 ठार, 21 जखमी
Photo Credit -X

China: चीनच्या नैऋत्य प्रांतातील युनान येथे आज मंगळवारी एका हॉसपीटमध्ये मोठी हिंसक घटना घडली. काही अज्ञातांनी हातात चाकू (Knife Attack)घेऊन हॉस्पीटमध्ये धुमाकूळ घातला. या घटनेत दोघांचा मृत्यू (Two Died)झाला आहे. अद्याप मृतांची माहिती समोर आलेली नाही. एएनआय वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला झेंक्सींगकौंटी येथील स्थानिक रुग्णालयात झाला. त्यात दोन जण ठार झाले आहेत. या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातील काहींमध्ये पोलिसांनी हल्ल्यातील एका संशयिताला अटक केल्याचे दिसत आहे. हॉस्पीटलजवळच्याच परिसरातून पोलिसांनी संशयीत आरोपीला अटके केल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Pakistan Shocker: 13 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याप्रकरणी 70 वर्षीय वृद्धाला अटक; पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथील घटना)

पोलिसांकडून अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलीस प्रशासन घटनेचा तपास करत आहेत. पकडलेला संशयित खरोखरच हल्लेखोर आहे की नाही हे अस्पष्ट आहे. अधिकारी त्यासंबंधीत माहिती गोळा करत आहेत.