Gabriela Peralta and Victor Hugo Peralta (PC - Instagram)

Tattoo: छंद ही एक अशी गोष्ट आहे, ज्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जायला तयार होता. अशा वेळी तुमच्या छंदात तुमची साथ देणारे कोणी सापडले तर काय बोलावे. अर्जेंटिनातील (Argentina) एका जोडप्याला पाहून लोक असेच काहीसे बोलत आहेत. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून अर्जेंटिनाची ही जोडी सतत चर्चेत आहे. गॅब्रिएला (Gabriela Peralta) आणि व्हिक्टर (Victor) नावाच्या या जोडप्याने नुकताच विक्रम केला आहे. दोघांनीही आपल्या शरीरावर 98 टॅटू आणि बॉडी मॉडिफिकेशन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

यापूर्वी 2014 मध्ये याच जोडप्याने 84 फेरफार करून विश्वविक्रम केला होता. आता गॅब्रिएला आणि व्हिक्टरने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. या जोडप्याने आतापर्यंत 98 टॅटू, 50 छेदन, 8 मायक्रोडर्मल्स, 14 बॉडी इम्प्लांट, 5 डेंटल इम्प्लांट, 4 कान विस्तारक, 2 कान बोल्ट आणि 1 काटे असलेली जीभ त्यांच्या शरीरावर काढली आहे. एवढेच नाही तर दोघांनीही डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर टॅटू बनवले आहेत, ज्यामुळे त्यांचे डोळे पूर्णपणे काळे दिसत आहेत. आजकाल लोकांची टॅटूची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टॅटू काढणे जितके कूल दिसते तितकेच ते धोकादायक देखील असू शकते. (हेही वाचा -Covid Vaccination Tattoo: इटलीतील 22 वर्षीय विद्यार्थ्याने हातावर गोंदवला कोविड प्रमाणपत्राचा बारकोड टॅटू)

टॅटूमुळे या आरोग्याच्या समस्या जाणवू शकता -

संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना वेगवेगळ्या रंगांच्या टॅटू विशेषत: लाल, हिरवा, पिवळा आणि निळा अशा रंगांची अॅलर्जी असू शकते. या रंगांमुळे टॅटूच्या ठिकाणी खाज सुटणे आणि सूज येऊ शकते.

त्वचेचा संसर्ग:

टॅटू काढल्यानंतर त्वचेला बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यासोबतच काही लोकांना सूज येण्याची समस्याही दिसून येते. याशिवाय टॅटू केलेल्या ठिकाणी जळजळ देखील होऊ शकते. (हेही वाचा - HIV Infection From Tattoo: टॅटू गोंदवला आणि एचआयव्ही झाला, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील घटना)

रक्तजन्य रोग:

टॅटू मशीनची सुई दूषित आणि संक्रमित असल्यास, यामुळे हेपेटायटीस बी, सी आणि एचआयव्हीसह विविध रक्तजन्य रोग होऊ शकतात, जे घातक आणि प्राणघातक ठरू शकतात.

सेप्सिस: हा एक जीवघेणा आजार आहे, जो संसर्गामुळे होतो. या आजारामुळे अवयव निकामी होऊन मृत्यू होऊ शकतो.