मोठ्या नावासह अडचणीदेखील तशाच मोठ्या निर्णाण होतात. इलेक्ट्रोनिक विश्वात दबदबा असलेल्या Apple च्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. आतापर्यंत Apple आणि Samsung यांची कायदेशीर लढाई चालू होती. त्यानंतर आता रशियामधील एका व्यक्तीने Apple कंपनीवर दावा ठोकला आहे. आरोप करणार्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, Apple ने त्याला समलैंगिक म्हणजेच गे (Gay) बनवले. आयफोनच्या एका अॅपने त्याच्यात बदल घडवून आणला ज्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कमी झाला. या व्यक्तीने दावा केला की, त्याने बिटकॉइनची (Bitcoin) ऑर्डर दिली होती, मात्र त्याऐवजी त्याला 'गेकॉइन'ची (GayCoin) डिलिव्हरी मिळाली यामुळे आता त्याच्या आयुष्यात उलथापालथ झाली आह.
न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानुसार, कंपनीच्या या चुकीबद्दल व्यक्तीने जवळजवळ 10,96,539.15 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युवकाने Apple च्या अॅपवरून बिटकॉइन मागविले होते, परंतु त्याला गेकॉईन वितरित करण्यात आले. गेकॉइनवर एक मेसेज लिहिला होता, ‘ट्राय करण्याआधी जज करून नका’. हे वाचल्यानंतर या युवकाने समलिंगी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा एक बॉयफ्रेंडदेखील आहे. या व्यक्तीच्या वकिलाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले आहे (हेही वाचा: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोकप्रिय महिला खेळाडूने दिली लेस्बियन असल्याची कबुली; महिलेसोबतच्या नात्याचाही खुलासा)
मात्र यामुळे त्याचे आयुष्य पूर्णतः बदलले आहे. त्याच्या घरच्यांना ही गोष्ट कशी सांगावी याबाबत तो चिंतीत आहे आणि याच गोष्टीमुळे त्याला मानसिक तणावही आलेला आहे. या गोष्टीसाठी या युवकाने Apple ला जबाबदार ठरवले आहे, कारण आता या गोष्टीतून तो बाहेर पडण्याचा फार कमी शक्यता आहेत. याप्रकरणी 20 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावर 17 ऑक्टोबर रोजी कोर्टाकडून सुनावणी होणार आहे.