
ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) कुत्र्यांवरील बलात्काराचे (Rape on Dogs) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी प्रसिद्ध मगर तज्ञ (Crocodile Expert) अॅडम ब्रिटन (Adam Britton) हा कुत्र्यांवर बलात्कारासह इतर 60 हून अधिक आरोपांमध्ये दोषी आढळला आहे. ब्रिटन हा कुत्रे मरेपर्यंत त्यांच्यावर बलात्कार करायचा. याशिवाय लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणीही तो दोषी आढळला आहे. अॅडमने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅडमने 42 कुत्र्यांवर अत्याचार आणि बलात्कार केला होता. त्यापैकी 39 कुत्र्यांचा मृत्यू झाला. कुत्र्यांवर बलात्कार करताना तो त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करायचा. यादरम्यान तो त्यांचे व्हिडिओही बनवत असे. अॅडमने आपल्या वासनेचा बळी बनवलेल्या कुत्र्यांमध्ये त्याचे पाळीव कुत्रेही सामील होते.
अॅडम आजूबाजूच्या परिसरातील कुत्रे पकडण्यासाठी सोशल साइट्सची मदत घेत असे. याद्वारे तो मुख्यत्वे अशा लोकांचा शोध घ्यायचा ज्यांना काही कारणास्तव त्यांचे पाळीव कुत्रे सांभाळणे शक्य नव्हते. अॅडम अशा कुत्र्यांच्या मालकांना सांगत असे की तो त्यांची चांगली काळजी घेईल. त्यानंतर विश्वास संपादन करून तो त्यांच्या कुत्र्यांना घेऊन जायचा. त्यानंतर अशा कुत्र्यांवर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ बनवायचा. हे सर्व करण्यासाठी अॅडम ब्रिटनने त्याच्या घरी एक शिपिंग कंटेनर ठेवला होता. या कंटेनरभोवती त्याने कॅमेरे लावले होते. त्याला तो 'टॉर्चर रूम' म्हणायचा.
इथून तयार केलेले व्हिडिओ तो वेगवेगळ्या नावाने इंटरनेटवर शेअर करत असे. याशिवाय त्याने टेलिग्रामच्या माध्यमातून समविचारी लोकांसोबत कुत्र्यांच्या बलात्काराचे व्हिडिओही शेअर केले होते. एप्रिल 2022 मध्ये ब्रिटनच्या घरावर छापेमारी करताना, पोलिसांनी त्याच्या लॅपटॉपमधून कुत्र्यांच्या बलात्काराच्या व्हिडिओंसह बाल लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओही जप्त केले होते. यानंतर पोलिसांनी अॅडमला अटक केली. (हेही वाचा: Bhopal: गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रस्त्याकडेला अर्धनग्न फिरणाऱ्या पीडितेकडे नागरिकांचे अक्षम्य दुर्लक्ष)
आता न्यायालयाने त्याला बलात्कार, कुत्र्यांची हत्या आणि त्यांचे व्हिडिओ बनवणे आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ शेअर करणे या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. या प्रकरणात, न्यायालय डिसेंबर 2023 मध्ये अॅडम ब्रिटनच्या शिक्षेची घोषणा करेल. अॅडम ब्रिटन हा प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ आणि मगर तज्ञ आहे. त्याने बीबीसी आणि प्रतिष्ठित नॅशनल जिओग्राफिक चॅनलसाठी अनेक कार्यक्रम केले आहेत. साधारण 2014 पासून तो कुत्र्यांवर बलात्कार करत होता.