भोपाळ येथील नागरिकांचा अक्षम्य बेजबाबदारपणा पुढे आला आहे. येथील एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर अज्ञाताने बलात्कार केला. त्यानंतर तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर सोडून देण्यात आले. तशाच अवस्थेत ती रस्त्यावर पडून होती. तसेच, फिरतही होती. पण नागरिकांची उदासिनता इतकी की, त्यांनी तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेने अनेकांकडे मदत मागितली. मात्र, तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. अखेर ती एका आश्रमात पोहोचली. तिथल्या एका पुजार्‍याला तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आल्याने तिने तिला टॉवेलने झाकून जिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)