Dating Website वर जास्त मुली नसल्याने चढला रागाचा पारा; लाखोंचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या व्यक्तीने कंपनीविरुद्ध दाखल केला खटला 
Online dating (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील (US) एका डेटिंग अॅपबाबत (Dating App) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो (Colorado) येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने 'द डेन्व्हर डेटिंग कंपनी' (The Denver Dating Co) नावाच्या डेटिंग वेबसाइटवर गुन्हा दाखल केला आहे. याचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या डेटिंग साइटवर महिलांच्या पुरेशा प्रोफाइल नाहीत, त्यामुळे ही साइट आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली असल्याने त्याने कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीच्या या कृतीने कंपनीलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

29 वर्षीय इयान क्रॉस या व्यक्तीने या डेटिंग वेबसाइटच्या सबस्क्रिप्शनसाठी डेन्व्हर डेटिंग कंपनीला भरपूर रक्कम अदा केली होती. मात्र इयानने दावा केला की, त्याला या डेटिंग वेबसाइटवर त्याच्या वयाच्या मुलीच दिसत नाहीत. त्यामुळे पैसे भरून घेतलेल्या या सबस्क्रिप्शनचा काय फायदा? यासंदर्भात इयानने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला समाधानकारक उत्तर मिळलेल नाही.

आता परफेक्ट मॅच न मिळाल्यामुळे इयान क्रॉसला इतका राग आला की त्याने कंपनीवर खटला दाखल केला. डेन्व्हर पोस्टच्या म्हणण्यानुसार, इयान क्रॉसला सांगण्यात आले होते की, या वेबसाइटवर मोठ्या संख्येने अविवाहित महिला आहेत व त्यानंतरच त्याने याचे सदस्यत्व घेतले होते. त्याला सांगण्यात आले होते की, महामारीमुळे अनेक ब्रेकअप झाले आहेत आणि डेटिंगसाठी वेबसाइटवर 25-35 वर्षांच्या बऱ्याच मुलींचे प्रोफाइल्स उपलब्ध आहे. (हेही वाचा: Couple-Porn Survey: एकत्र पॉर्न पाहणाऱ्या जोडप्यांच्या Sex Life बाबत रिसर्चमध्ये मोठा खुलासा; पार्टनरसोबत 'तसले' व्हिडिओ पहिल्याने...)

आता इयानचा आरोप आहे की तो फेब्रुवारीपासून ही वेबसाइट वापरत आहे आणि त्याला 18-35 वयोगटातील केवळ 5 मुलींच्या प्रोफाइल दिसल्या आहेत. यामुळे आपले 7 लाखांचे सबस्क्रिप्शन रद्द करून परतावा देण्याची मागणी त्याने केली आहे. इयानच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, वेबसाइटने त्यांच्या अशिलाचे पैसे परत केले नाहीत तर त्यांना कोर्टात जावे लागेल. वेबसाईटवर खोटी आणि दिशाभूल करणारी आश्वासने दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.