‘पॉर्न’ (Porn) या विषयाबाबत अजूनही समाजामध्ये उघडपणे बोलले जात नाही. किंबहुन एका वाकड्या नजरेने याकडे पाहिले जाते. आता फ्रंटियर्स इन सायकोलॉजीमध्ये (Frontiers in Psychology) नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, जे विषमलिंगी जोडपी (Heterosexual Couples) एकत्र पॉर्न पाहतात त्यांचे शारीरिक, भावनिक संबंध मजबूत असतात आणि लैंगिक जीवनही (Sex Life) चांगले असते असे दिसून आले आहे. दुस-या शब्दात सांगायचे तर, जी जोडपी नेहमी एकत्र पोर्नोग्राफी व्हिडिओ पाहतात ते त्यांच्या रोमँटिक संबंधांबद्दल आणि त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल अधिक समाधानी असतात.
बेल्जियम आणि कॅनडामधील अनुक्रमे लुवेन विद्यापीठ आणि वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे टेलर कोहूत, यांनी नात्यामधील पोर्नोग्राफीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी तसेच त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी याबाबत संशोधन केले. अभ्यासामध्ये 'तीन स्वतंत्र प्रयोगशाळां'द्वारे प्राप्त केलेल्या डेटाचे तीन संच एकत्र समाविष्ट करण्यात आले. यामध्ये 761 विषमलिंगी जोडप्यांचा समावेश होता.
या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर दिसून आले की, जी जोडपी एकत्र पोर्नोग्राफी पाहतात त्यांचे संबंध, जी जोडपी एकत्र पॉर्न पाहत नाहीत त्यांच्यापेक्षा मजबूत होते. तसेच एकत्र पॉर्न पाहणाऱ्या जोडप्यांचे लैंगिक जीवन हे अधिक समाधानी असल्याचेही आढळले. आता तुम्ही विचाराल असे का? तर संशोधनामध्ये दिसून आले आहे की, पॉर्नमध्ये दोन्ही जोडप्यांमधील ‘लैंगिक संवाद’ सुधारण्याची क्षमता आहे.
त्याच वेळी, असेही दिसून आले आहे की जी जोडपी स्वतंत्रपणे पोर्नोग्राफी व्हिडिओ पाहतात त्यांचे नाते तितकेसे मजबूत नसते. विशेषतः अशा जोडप्यांमधील एका व्यक्तीचा पॉर्नबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असेल किंवा ते अजिबात पॉर्न पाहत नसतील, तर नात्यात कदाचित समस्या उद्भवू शकतात. मात्र जर का जोडप्यांमधील दोघे जण स्वतंत्रपणे वेगवेगळे पॉर्न पाहत असतील तर कदाचित नात्यामध्ये थोडाफार समतोल राखला जाऊ शकतो. मात्र याबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचे कोहूत यांनी सांगितले आहे. संशोधकाने असेही म्हटले आहे की समलिंगी जोडप्यांसह देखील असाच अभ्यास केला पाहिजे.