Afghanistan-Taliban Conflict: अफगाणिस्थानचे राष्ट्रपती पळून गेल्यावर Amarullah Saleh यांनी तालिबानला दिले आव्हान, जाणून घ्या कोण आहेत अमरुल्ला सालेह ?
Amrullah Saleh (Pic Credit - Amrullah Saleh Twitter)

काबूल (Kabul) तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेले आहे. त्यामुळे तालिबान आता सरकार स्थापनेचा दावा करत आहे. पण अफगाणिस्तानात (Afghanistan) लोकशाहीची अजून एक आशा आहे. तेथे एक मोठा नेता आहे आणि तो अजूनही देशातून पळून गेला नाही. परंतु तालिबानशी एक-एक लढ्याबद्दल बोलत आहे.  तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केला आहे, मात्र अजूनही एक क्षेत्र आहे जेथे तालिबान पोहोचू शकले नाही. त्या भागात 1 लाख लोक राहतात. त्यांच्या मागे एक नेता उभा आहे.तो छातीवर गोळी घेईल पण तालिबानपुढे झुकणार नाही. जेव्हा देशाचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (President Ashraf Ghani) पळून गेले. तेव्हा या नेत्याने तालिबानला आव्हान दिले आहे. अमरुल्ला सालेह (Amarullah Saleh) असे या नेत्याचे नाव आहे. सालेह गनी सरकारमध्ये उपराष्ट्रपती (Vice President) होते. अमरुल्ला सालेहने स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले आणि तालिबानशी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचे वचन दिले आहे.

त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी देशात आहे आणि कायदेशीररित्या मी या पदाचा दावेदार आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे संविधान त्याला ते घोषित करण्याचे अधिकार देते. त्यांनी लिहिले आहे की ते सर्व नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. जेणेकरून त्यांचा पाठिंबा मिळू शकेल आणि एकमत होऊ शकेल. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासारखे आपल्या देशातून पळून गेले नाहीत.

तालिबान्यांनी पकडल्यानंतर सालेहचे पहिले चित्रही समोर आले. ते अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये दिसले आहेत. अहमद मसूदचा मुलगा सालेह अहमद शाह आणि तालिबानविरोधी कमांडरला भेटताना दिसला होता. सध्या तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यापासून माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि शांतता परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक अफगाण नेते चर्चेत आहेत. हेही वाचा हिंदू पंडित राजेश कुमार यांचा अफगाणिस्तान मधील मंदिर सोडण्यास नकार, तालिबानने ठार मारले तरीही माझी सेवा करत राहणार

कोण आहेत अमरुल्ला सालेह ? 

अब्दुल रशीद दोस्तम यांच्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये अमरुल्ला सालेह यांनी उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये अफगाणिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री आणि 2004 ते 2010 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाचे प्रमुख म्हणून काम केले. सोव्हिएत समर्थित अफगाण सैन्यात भरती होऊ नये म्हणून 1990 मध्ये सालेह विरोधी मुजाहिदीन सैन्यात सामील झाले. त्यांनी पाकिस्तानमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतले आणि मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूदच्या नेतृत्वाखाली लढले. 1990 च्या उत्तरार्धात ते नॉर्दर्न अलायन्सचे सदस्य झाले आणि तालिबानच्या विस्ताराविरोधातही लढा दिला.

सालेह खुलेआम पाकिस्तानचा विरोधक आणि भारताचा जवळचा मानला जातो.  अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर करून पाकिस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. भारताकडून मदत मागण्यासाठी अमरुल्ला सालेहने भारतीय मुत्सद्दी मुथु कुमार आणि मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांच्यात एक बैठक आयोजित केली होती.