11.11 Sale (Photo Credits: AliExpress)

जगातील अव्वल ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अलिबाबा (Alibaba), दरवर्षी 11 नोव्हेंबरला एक मेगा शॉपिंग इव्हेंट आयोजित करते. यामध्ये 24 तासांसाठी एका खास सेलचे आयोजन केले जाते. हा सेल जगात 'सिंगल्स डे' सेल  (Singles Day) म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वेळीही सोमवारी हा सेल पार पडला. हा सेल पार पडल्यानंतर अलिबाबा दावा करीत आहे, की कंपनीने 90 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत तब्बल 1630 दशलक्ष डॉलरहून अधिक वस्तूंची विक्री झाली आहे. 24 तासांचा हा सेल कंपनीच्या चॅनेल टीममोल ग्लोबलवर आयोजित करण्यात आला होता.

कंपनीने चोवीस तासांत 38.4 अब्ज डॉलर (27,38,64,10,00,000.00 रुपये) विक्री केली आहे. अमेरिकेमध्ये ब्लॅक फ्रायडे आणि सायबर सोमवारसारखे खरेदी कार्यक्रम आयोजित केले जातात. हे लक्षात घेता अलिबाबाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झांग यांनी 2009 मध्ये, चीनमध्ये ‘सिंगल्स डे’ आयोजित करायला सुरुवात केली. त्यानंतर हा कार्यक्रम गेल्या 10 वर्षात जगातील सर्वात मोठा शॉपिंग इव्हेंट बनला आहे. अलिबाब समूहाच्या विविध ऑनलाईट प्लॅटफॉर्मवर 29.45 सेकंदात 10 अरब डॉलरची (71 हजार कोटी) विक्री केली आहे. त्यांनी गेल्या वर्षी 16 तास 31 मिनीटांमध्ये अशी विक्रमी विक्री केली होती. (हेही वाचा: चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीने घेतली निवृती; 'अलिबाबा'चे संस्थापक Jack Ma वाढदिवसादिवशी अध्यक्षपदावरून पायउतार)

अलिबाबाचे अध्यक्ष म्हणून जॅक मा यांनी पद सोडल्यानंतर कंपनीचा हा पहिला सिंगल डे इव्हेंट आहे. 486 अब्ज डॉलर (जवळजवळ 34682.66 अब्ज रुपये) बाजारभाव असलेल्या अलिबाबाने, अमेरिकन पॉपस्टार टेलर स्विफ्ट आणि जॅक्सन यी यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या शोमधून यावर्षी सिंगल डे सुरू केला. या वेळी 22 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रँडने यामध्ये भाग घेतला आहे.