Ayman al Zawahiri (credit- ANI)

अल-कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी (Al Zawahiri) याला ठार मारण्यात आले आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. व्हाईट हाऊसने सोमवारी सांगितले की, अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) एका ड्रन हल्ल्यात अलकायदाचा प्रमुख जवाहिरी याला लक्ष्य करण्यात आले. राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी म्हटले की, संयुक्त राज्य अमेरिकेने (United States) केलेल्या हवाई हल्ल्यात अल जवाहिरी ठार झाला.

अल कायदा प्रमुख अयमान अल जवाहिरी हा इजिप्तचा एक शल्यविशारद होता. जो पुढे दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल कायदाच्या संपर्कात आला. अमेरिकेतील 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी अल जवाहिरी एक होता. ज्या लोकांनी वर्ल्ड ट्रेड सेंटवर हल्ला करण्याचा कट आखला त्यापैकी असलेल्या प्रमुख लोकांपैकी तो एक होता. वर्ल्ड्र ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात 3 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.  (हेही वाचा, मुस्लिम ब्रदरहूड: विचार, कार्य आणि दहशतवाद)

अल जवाहिरी हा ओसमा बिन लादेन यांच्यानंतर अल कायदा या संघटनेचा प्रमुख बनला होता. जवाहिरी याच्यावर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. 2011 मध्ये पाकिस्तानातील एका प्रांतात ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने ठार मारले. त्यानंतर जवाहिरी हा ओसमाप्रमाणे संघटनेची जबाबदारी पाहात होता. न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंक्टन पोस्ट आणि सीएनएन यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाद्यमांनीही अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 31 ऑगस् 2021 ला अमेरिकी सैन्याने अफगानिस्तानातून सैन्य हटवल्यानंतर केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला.