भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी सोमवारी इस्राइलचे पंतप्रधान (Prime Minister of Israel) बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांची भेट घेतली. यावेळी नेतन्याहू यांनी हमास आणि इस्राइलमध्ये गाझापट्टीत सुरु असलेल्या युद्धाविषयी माहिती दिली.  याबैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख, पंतप्रधानांचे परदेशी धोरण सल्लागार आणि इस्राइलचे राजदूत सहभागी झाले होते. ही बैठक जेरुशलम येथील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली.  बैठकीमध्ये हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या बंधकांना सोडण्यासंबंधी चर्चा झाली. (हेही वाचा - Israel-Hamas War: मानवतावादी मदतीसाठी अमेरिका गाझामध्ये तयार करणार तात्पुरते बंदर; Joe Biden यांचे सैन्याला आदेश)

रमजानच्या महिन्यात हमास सातत्याने गाझा पट्टीमध्ये युद्धविराम करण्याची मागणी करत आहे. हमासने म्हटलं की, आम्ही युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. अनेकवेळा सामंजस्यावर बैठका झाल्या आहेत, परंतु इस्राइलमुळे बैठकांमधून काही हाती लागलेलं नाही.  गाझामध्ये पवित्र रमजान महिना सुरु झाला आहे. लोकांनी बॉम्बवर्षाव सुरु असतानाही रोजा ठेवायला सुरुवात केलीय. लोकांकडे खाण्यापिण्यासाठी काहीही नाहीये. इस्रायली हल्ल्यात क्षतिग्रस्त झालेल्या घरांमध्ये जागा शोधून नमाज अदा केली जात आहे.

पाहा पोस्ट -

परिस्थितीतही लोक एकसोबत रोजा सोडत आहेत. काही ठिकाणांवरुन लहान मुलांच्या नाचगाण्याचे आवाज येतात. तर लाऊडस्पिकरवरुन अजान ऐकू येतोय. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली प्रतिकार झाला, त्यानंतर गाझापट्टीमध्ये सगळंकाही बदललं आहे.