Air New Zealand Passenger : ऑकलंडहून सिडनी (Sydney)ला जाणाऱ्या एअर न्यूझीलंड(Air New Zealand)च्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 53 वर्षीय मद्यधूंद (drunk)प्रवाशाने फ्लाईटमध्येच बसल्या जागी सीटवर चक्क कपात लघूशंका केली. नंतर प्रसाधगृहाकडे तो कप घेऊन जाताना तो अडखळला आणि तो कप थेट एका अटेंडंटवर सांडला. या घटनेची माहिती मिळताच हे प्रकरण नंतर कोर्टात गेले. त्यावर कोर्टाने आरोपीला दंड ठोठावला आहे. (हेही वाचा :Flight Emergency Landing: अमेरिकेत मोठा हवाई अपघात टळला! साउथवेस्ट एअरलाइन्सच्या बोईंग 737 चे इंजिन काउलिंगचा भाग तुटल्याने इमर्जन्सी लँडिंग, पाहा व्हिडिओ )
30 डिसेंबर रोजी एअर न्यूझीलंडच्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. एका सहप्रवाशाने त्या 53 वर्षीय प्रवाशाच्या कृत्याची माहिती क्रू मेंबर्सला दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली. हॉली असे त्या महिला प्रवाशाचे नाव आहे. ती तिच्या 15 वर्षाच्या मुलीसह त्याच विमानातून प्रवास करत होती.
हॉली यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने त्या मद्यधूंद प्रवाशाचे सगळे कृत्य पाहिले होते. ही घटना घडली तेव्हा विमान सुमारे 20 मिनिटे धावपट्टीवर उभे होते. तो व्यक्ती नशेत होता. डिप्लॅनिंगला खूप वेळ झाल्याने 53 वर्षीय मद्यधूंद प्रवाशाने कपामध्ये लघूशंका करताना तिने पाहिले होते. त्यानंतर कप प्रसाधनगृहाकडे नेत असताना तो अडखळल्यामुळे फ्लाइट अटेंडंटवर तो कप सांडला. दरम्यान दोषी प्रवाशाला त्याच्या कृत्यामुळे 600 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठावला गेला आहे.
या प्रकरणात एअर न्यूझीलंडकडून स्पष्टीकरण आले आहे. 'ते वैयक्तिक घटनांवर भाष्य करत नाही. पण, जर कोणत्या प्रवाशाने असे वर्तन केले तर अशा प्रवाशांवर ते बंदी घालतात. ज्यामध्ये दर महीन्याला 5-10 प्रवाशांचा समावेश असतो.' असे एअर न्यूझीलंडकडून सांगतण्यात आले आहे.