New Ebola Outbreak: कोरोना व्हायरस नंतर आता इबोला ने 'या' देशात घेतले चार बळी; WHO तर्फे करण्यात आली पुष्टी
Ebola Virus In Cango (Photo Credits: Youtube)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसाराने जगभरात अगोदरच असणारे चिंतेचे वातावरण आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे, कारण आता कोरोनाच्या भयंकर व्हायरस सोबतच इबोला (Ebola) या जीवघेण्या व्हायरसची सुद्धा संक्रमण होत असल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, या इबोला व्हायरसने अगोदरच कांगो (Cango) या देशात चार बळी घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी या व्हायरसचे सहा जणांना संक्रमण झाले होते त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. कांगो देशातील पश्चिमी शहर मबंडाका (Mabdanka) येथे ही प्रकरणे आढळून आली होती. यापूर्वी 2018 मध्ये सुद्धा इबोला चे संक्रमण कांगो देशात झाले होते. मागील दिवसात कांगो मध्ये कोरोनाचे  सुद्धा 3000 रुग्ण आढळून आले आहेत. Coronavirus Update: कोरोना व्हायरसच्या 1,90,535 रुग्णांसह आज सर्वाधिक COVID 19 रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत 7 व्या स्थानावर, पहा यादी

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती देताना सांगितले की, कांगोचा स्थानिक आरोग्य मंत्रालयाकडून इबोलाचा प्रसाराबाबत माहिती देण्यात आली. सुदैवाने अद्याप केवळ 6 रुग्ण आढळून आले आहेत, आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. सुदैवाने ज्या शहरात इबोलाची संक्रमण आढळून आले आहे तिथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

ANI ट्विट

दरम्यान, इबोला हा आक्रिकेच्या उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळून येणारा आजार आहे. या आजाराची मुख्य लक्षणं म्हणजे अचानक येणारा ताप, अशक्त वाटणे, स्नायूंमध्ये वेदना, खोकला, अशी आहेत. यामध्ये सुरुवातीला सतत उलट्या, डायरिया होणे असे त्रास सुद्धा होतात, काही वेळा शरीरात अंतर्गत किंवा बाहेर रक्तस्त्राव होतो. रक्तरस्तराव वाढल्यास मृत्यूचा धोका असतो. माणसांप्रमाणेच हा आजार, वानर, वटवाघूळ, हरीण या प्राण्याना सुद्धा होऊ शकतो. व्यक्ती किंवा संक्रमित जनावर यांच्या संपर्कात येताच हा आजार पसरू शकतो.