Hong Kong Banned Passenger Flights from India: नवी दिल्लीहून आलेल्या फ्लाईटमध्ये 49 जण कोरोना पॉझिटिव्ह; हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर घातली बंदी
विस्तारा फ्लाईट (PC- WIKIMEDIA COMMONS)

Hong Kong Banned Passenger Flights from India: नवी दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या विमानात 49 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर हाँगकाँगने भारतातून येणारी सर्व उड्डाणे थांबविली आहेत. 4 एप्रिल रोजी संक्रमित असलेले सर्व प्रवासी विस्ताराच्या विमानाने हाँगकाँगला गेले होते. या विमानातील 49 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. विशेष म्हणजे हाँगकाँगमध्ये दररोजच्या कोरोना संसर्गाच्या घटनांची संख्या यापेक्षा कमी आहे. यावर्षी जानेवारीमध्ये हाँगकाँगने कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेवर मात केली.

हाँगकाँग प्रशासनाने भारत, पाकिस्तान आणि फिलिपिन्सच्या सर्व उड्डाणांवर सोमवारपासून पुढील दोन आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. प्रशासनाने या देशांना ‘अत्याधिक जोखिम’ या यादीमध्ये टाकले आहे. (वाचा - Boris Johnson Cancels Visit to India Due to Covid-19: बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द; वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतला महत्त्वपूर्ण निर्णय)

विस्ताराच्या विमानात एकूण 188 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. परंतु, 4 एप्रिलला हाँगकाँगला गेलेल्या फ्लाईटमध्ये किती प्रवासी होते यासंदर्भात पुरेशी माहिती नाही. हाँगकाँगमध्ये, कोरोना-पॉझिटिव्ह रूग्णांना 3 आठवड्यांपर्यंत क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या पहिल्या स्थानांपैकी हाँगकाँग एक आहे, परंतु कठोर नियमांमुळे तेथे केवळ कोरोनाची 11 हजार प्रकरणे आहेत. हाँगकाँगने आतापर्यंत 75 लाख लोकसंख्येच्या 9.8 लोकांना कोरोनाची लस दिली आहे.