Herat Earthquake: अफगानिस्तानमध्ये आलेल्या 6.3 रिश्टर स्केल भूकंपात 14 जण ठार तर 78 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळ्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा साचला आहे. त्याच्याखाली अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल असेही हा अधिकारी म्हणाला. हेरात (Earthquake in Afghanistan) प्रांताचे सार्वजनिक आरोग्य संचालक मोहम्मद तालेब शाहिद यांच्या हवाल्याने एएफपी वृत्तवाहीणीने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत मध्यवर्ती रुग्णालयात आणलेले हे आकडे हे प्राथमिक माहितीवर आधारीत आहेत. ही अंतिम आकडेवारी नाही. आमच्याकडे माहिती आहे की लोक मोठ्या प्रमाणावर ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंपाचे केंद्र क्षेत्राच्या सर्वात मोठ्या शहर हेरातच्या वायव्येस 40 किलोमीटर (25 मैल) होते आणि त्यानंतर 5.5, 4.7, 6.3, 5.9 आणि 4.6 तीव्रतेचे पाच आफ्टरशॉक आले. (हेही वाचा, Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का)
तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11:00 वाजता (0630 GMT) भूकंपाचे धक्के जाणविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांनी रहिवासी दुकाने आणि दुकाने तसेच शहरातील इमारती सोडून पळ काढला, ज्यामुळे 25 जखमी आणि एकच मृत्यू झाला. हेरात येथील एक 45 वर्षीय नागरिकानेबशीर अहमद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही आमच्या कार्यालयात होतो आणि अचानक इमारत हादरायला लागली.भिंतींचे प्लास्टर खाली पडू लागले आणि भिंतींना तडे गेले. काही भिंती आणि इमारतीचे काही भाग कोसळले. हा प्रकार इतका भयानक होता की, मी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधू शकत नाही, नेटवर्क कनेक्शन डिस्कनेक्ट झाले आहेत. मी खूप चिंतेत आहे आणि घाबरलो आहे, असेही तो म्हणाला.
दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मुल्ला जान सायक यांनी सांगितले की, शहरांप्रमाणेच अनेक ठिकाणी डोंगराळ आणि पर्वतीय भागांमध्येही भूकंपाची घटना घडली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणची माहिती येण्सा बराचसा विलंब लागू शकतो. इतकेच नव्हे तर मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.
अफगानिस्तानमध्ये भूकंप येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये, 5.9-रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर 1,000 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो लोक बेघर झाले. तो भूकंप सुमारे एक चतुर्थांश शतकातील अफगाणिस्तानमधील सर्वात प्राणघातक होता. या वर्षाच्या मार्चमध्ये, ईशान्य अफगाणिस्तानमधील जुर्मजवळ 6.5 तीव्रतेच्या भूकंपात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला होता. अलिकडील काळात अफगानिस्तानातील भूकंपाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.