अफगानिस्तान (Afghanistan) सध्या राजकीय दृष्ट्या अत्यंत नाट्यमय आणि तितक्याच स्फोटक वळणावर आहे. अफगानिस्तानमध्ये आज (सोमवार, 9 मार्च 2020) एक अत्यंत रंजक आणि घटनात्मक पेच निर्माण करणारी घटना पाहायला मिळाली. अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी अफगानिस्तानचे राष्ट्रपती (Afghanistan President) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा दुसरा कार्यकाळ असणार आहे. परंतू, धक्कादायक असे की अशरफ गनी यांचे प्रतिस्पर्धी विरोधक अब्दुल्ला अब्दुल्ला (Abdullah Abdullah) यांनीही समांतर रुपाने राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. या प्रकारामुळे अफगानिस्तानमध्ये राजकीय संकट अधिक गहीरे झाले असून, तालिबानसोबत सुरु असलेल्या शांततामय बोलण्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशरफ गनी यांचा शपथविधी सुरु असताना बॉम्ब स्फोटाचे आवाज ऐकू आले. त्यानंतर शपतविधी सुरु असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटानंतर लोक कार्यक्रमाच्या मागच्या बाजूने धावू लागले. अशा स्थितीतही अशरफ गनी भाषण देत राहीले.
अशरफ गनी यांनी भाषणादरम्यान सांगितले की, 'मी अल्लाच्या नावाने शपथ घेतो की, मी पवित्र इस्लाम धर्माचे पालन करेन आणि त्याचे रक्षण करेन. मी संविधानाचा सन्मान, संरक्षण करेन आणि देशातही ते लागू करेन.' गनी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला देशविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. (हेही वाचा, अमेरिका-तालिबान यांच्यामध्ये शांतता करार, 14 महिन्यात अफगाणिस्तान मधून US सैन्य करणार खाली)
एएनआय ट्विट
#WATCH Afghanistan: Multiple explosions reported during President #AshrafGhani's oath taking ceremony in Kabul. pic.twitter.com/8N7aYrdAuS
— ANI (@ANI) March 9, 2020
गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये झालेल्या निवडणुकीत गनी यांना विजयी घोषीत करण्यात आले होते. परंतू, गनी यांचे विरोधक अब्दुल्ला यांनी मतदानाचे आव्हान दिले होते. आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वतंत्रपणे शपतविधी कार्यक्रम आयोजित केला आणि गनी यांना समांतरपणे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. या वेळी अब्दुल्ला यांनी स्वतंत्रता, राष्ट्रीय सांप्रदायिकता आणि अफगानिस्तानच्या अखंडतेबद्दल शपथ घेतली.