अमेरिका-तालिबान मध्ये शांतता करार (Photo Credits-ANI)

संयुक्त राष्ट्र अमेरिका (US) आणि तालिबान (Taliban) यांच्यामध्ये शांतता करारावर हस्ताक्षर करण्यात आले. या करारानुसार अफगाणिस्तामधील सर्वात मोठ्या अमेरिकेच्या युद्धाला पुर्णविराम मिळाला आहे. जवळजवळ 30 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे विदेश मंत्र्यांसह अमेरिका-तालिबान मधील शांतता कराराचे साक्षीदार बनले आहेत. या कराराअंतर्गत अमेरिका 14 महिन्याच्या आतमध्ये त्यांचे सैन्य अफगाणिस्तान मधून खाली करणार आहे. या दरम्यान, माइक पॉम्पिओ यांनी असे सांगितले की, तालिबान त्यांच्या वचनांचे पालन करणार आहे. तसेच तालिबानांवर बारीक लक्ष सुद्धा ठेवले जाणार आहे.

सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दोन्ही देश कैद्यांना सुद्धा मुक्त करणार आहेत. त्यानुसार अमेरिका आणि अफगाणिस्तान सरकार तालिबानच्या 5 हजार कैद्यांना मुक्त करणार असून त्या बदल्यात तालिबान अफगाणिस्तान सरकार 1 हजार कैद्यांना सोडणार आहेत.(आयर्लंडचे महाराष्ट्रीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी दिला पदाचा राजीनामा; संसदीय निवडणुकीत झाला पराभव)

अमेरिका आणि तालिबान यांच्या शांतता करारा मध्ये अल-कायदा, आईएआईएस-के आणि अन्य आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या द्वारे संयुक्त राज्य किंवा त्यांच्या मित्रदेशांसोबत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास तर US, अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक रिपब्लीकच्या संमतीने तेथे लष्करी कारवाई करू शकते. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात तळ ठोकला होता. या लष्करी लढाईत आतापर्यंत मोठ्या संख्येने लोक ठार झाले आहेत.

वॉशिंग्टन आणि काबुलने शनिवारी एका विधानात असे म्हटले होते की, शांतता करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर 135 दिवसांच्या आतमध्ये अमेरिका त्यांच्या सहयोगींच्या मदतीने 8600 सैनिकांना परत बोलावणार आहे. यामध्ये असे ही म्हटले आहे की, हा देश 14 महिन्यात अफगाणिस्तानमधून त्यांचा सैनिकांना परत बोलावणार आहे.