देशात कितीही कायदे वा नियम आले तरीही बलात्काराचे (Rape) गुन्हे काही थांबत नाही. वासना हा प्रकार इतका वाढत चालला आहे की ज्याला अगदी अल्पवयीन मुलींपासून प्रौढ महिलांवर बलात्कार होण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता नायजेरियातील (Nigeria) कदुना (Kaduna) प्रांताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या देशात यापुढे बलात्कार करणा-या आरोपीस नपुंसक करण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. हा खूपच धाडसी निर्णय असून या निर्णयाचे येथेली नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे 14 वर्षांखालील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून या निर्णयाची दखल अन्य देशांनी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. विरार येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केलेल्या राजस्थान मधील 22 वर्षीय तरुणाला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
नायजेरियात असा धाडसी निर्णय घेण्यामागचे कारणही तसेच आहे. जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला असून नायजेरियात बलात्काराच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. त्यामुळे येथील संतप्त नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. परिणामी येथील राज्यपालांना येथे आणीबाणी जाहीर करावी लागली. तसेच या बलात्का-यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी येथील नागरिकांसह महिला संघटनांनी देखील पुढाकार घेतला होता. याचा सर्व बाजूंनी विचार करत कदुना मध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील ठाणे (Thane) शहरात आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी, 24 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.