 
                                                                 मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नुकत्याच एक 22 वर्षीय तरुणाला अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याचा आरोपाखाली अटक केली आहे. हा तरुण मूळचा राजस्थानचा (Rajsthan) असून पीडिता ही विरार (Virar) येथील रहिवाशी आहे. या दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती, काही दिवसांपूर्वी संबधित पीडित मुलगी ही दक्षिण मुंबई (South Mumbai) येथील आगरीपाडा (Agripada) भागात राहणाऱ्या आजीच्या घरी गेली होती, याठिकाणहून आरोपीने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने तिला अपहरण करून पळवून आणले. या मुलीला घेऊन तिघेही थेट राजस्थान मधील स्वतःच्या मूळगावी गेले होते, तिथेच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. नालासोपारा येथे महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहासोबत Sex करणाऱ्या दुकानदाराला अटक
यासंदर्भात पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा हरियाणा मध्ये एका कंपनीत काम करतो, त्याने मध्य प्रदेश मधील आपल्या तीन मित्रांच्या सोबत मुंबईत येऊन 1 जुलै रोजी या मुलीचे अपहरण केले होते. या मुख्य आरोपीसहीत आता त्या तीन मित्रांना सुद्धा मध्य प्रदेश मधून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी तरुण आणि पीडित मुलगी हे मागील 1 वर्षांपासून सोशल मीडियावरून संपर्कात होते. या मुलीच्या सोशल मीडिया अकाउंट ला ट्रेस करून पोलिसांनी संबंधित आरोपी हा राजस्थान मधील असल्याची माहिती मिळवली आहे. अल्पवयीन मुलांच्या बाबत अनेकदा सोशल मीडिया च्या माध्यमातून असे प्रकार घडतात. त्यामुळे पालकांनी अशा मुलांना अगोदरच विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद घेणे आवश्यक आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
