शेतकऱ्याने बनविले विमान, आयुष्यभराची कमाई लावली सार्थकी
विमान (फोटो सौजन्य- Pixabay)

चीनमध्ये एका शेतकऱ्याने आपले विमान बनविण्याचे स्वप्न अखेर खरे करुन दाखविले आहे. तसेच या शेतकऱ्याने आजवरची त्याची सर्व कमाई या विमानासाठी लावली आहे.

झू युए असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तसेच झू युए हा कांदा आणि लसुणची शेती करुन आपले आयुष्य घालवत आहे. या झूचे आपण एक विमान बनविण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो सतत अडीअडचणींवर मात करुन त्याच्या स्वप्नाच्या पाठी धावत होता. मात्र अखेर झूचे हे स्वप्न साकार झाले होऊन त्याने विमान बनविले आहे. तसेच या विमानाची प्रतिकृती ही एअरबस ए320 प्रमाणे आहे. परंतु या विमानाचे उर्वरित काम बाकी असल्याने ते उडण्यास अजून सक्षम नसल्याचे झूने सांगितले आहे.

चीनच्या या शेतकऱ्याने बनविलेल्या विमानाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. तसेच विमान बनविण्यासाठी त्याने 3 लाख 74 हजार डॉलर्स खर्च केले आहेत. तर या झूचे सातत्याने केलेले प्रयत्न, मेहनत याचा सर्वांना अभिमान वाटत आहे.