जगात अतिशय विकृत असे नरभक्षक लोक (Cannibals) आहेत यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. नरभक्षक लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कल्पनादेखील नसते की, ते किती धोकादायक लोकांच्यासोबत राहत आहेत. याआधी अनेक नरभक्षक लोकांचे अंगावर काटा आणणारे किस्से आपण ऐकले असतील, आताही असेच एक प्रकरण उघड झाले आहे. एका धोकादायक नरभक्षक महिलेने तीन जणांना ठार मारून त्यांच्या मांसाचा केक बनवला आणि तो शेजाऱ्यांना खाऊ घातला.
या शेजाऱ्यांना कल्पनाही नव्हती की ते एका भयानक गुन्ह्याचा भाग बनत आहेत. लिओनार्डा सियानसिलू (Leonarda Ciancillu) असे या महिलेचे नाव असून तिला लोकांची हत्या करण्याची आवड होती. आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी ती अनेकदा स्वतःच्या आयुष्याला कंटाळलेल्या महिलांना टार्गेट करायची. अशाप्रकारे या इटलीच्या पहिल्या महिला सिरीयल किलरने हे सिद्ध केले की गुन्हेगाराला कोणतेही लिंग नसते, तर त्याच्या मनात क्रूरता भरलेली असते. या महिलेने 3 धोकादायक खून केल्यानंतर मृतदेहांचे काय केले हे जाणून तुम्हाला धक्का बसेल.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, लिओनार्डाची केस ‘द सोप-मेकर ऑफ कोरेगिओ’ म्हणून प्रसिद्ध झाली. या धोकादायक महिलेचा पहिला बळी ठरली ती फोत्सिना सेट्टी नावाची महिला. 1939 मध्ये लिओनार्डाने तिला घरी बोलावले आणि आपण एक चांगला नवरा मिळवून देऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर तिने या महिलेकडून एका चिठ्ठी लिहून घेतली ज्यामध्ये नमूद केले होते की, ‘आपण काही दिवसांसाठी परदेशात जात आहोत’. नंतर तिने कुऱ्हाडीने या महिलेची हत्या केली
लिओनार्डाने तिच्या शरीराचे 9 तुकडे केले. हे तुकडे तिने कॉस्टिक सोडा टाकून साबण बनवण्यासाठी उकळले. तर रक्त एका भांड्यात गोळा करून त्यात मैदा, साखर, चॉकलेट, अंडी आणि दूध मिसळून त्यापासून केक बनवले. हा केक ती तिच्या घरी येणाऱ्या शेजाऱ्यांना खाऊ घालायची. (हेही वाचा: Shocking: बायकोचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे शिजवून खाल्ले; विवाहबाह्य संबंधामुळे संसार झाला उध्वस्त)
लिओनार्डाने 1940 मध्ये फ्रान्सिस्का सोवी नावाच्या महिलेला आपला दुसरा बळी बनवले. आधीप्रमाणेच तिने या महिलेची हत्या करून तिचा केक बनवला. त्याच वर्षी लिओनार्डाने नोकरीच्या नावाखाली आणखी एका महिलेला घरी बोलावून तिची हत्या केली. त्यापासूनही केक आणि साबण बनवला. मात्र यावेळी लिओनार्डाचा गुन्हा उघड झाला. या तिसऱ्या महिलेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर नरभक्षक लिओनार्डाला पोलिसांनी पकडले. तिने आपला गुन्हाही कबूल केला. ऑक्टोबर 1970 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी क्रिमिनल एसायलममध्ये तिचा मृत्यू झाला.