प्रतिकात्मक फोटो (File Photo)

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कंधार (Kandahar) शहरात मोठा हल्ला झाला आहे. हा हल्ला येथील सर्वात मोठ्या मशिदीवर (Mosque) झाला आहे. मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात (Bomb blast) आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 13 लोक जखमी झाले आहेत. स्थानिक टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. या मशिदीला बीबी फातिमा मस्जिद (Bibi Fatima Mosque) आणि इमाम बरगाह (fatemeh imam bargah mosque) म्हणून ओळखले जाते. हा शुक्रवारी नमाज पढताना बॉम्बस्फोट झाला आहे. शिया समुदायाच्या मशिदीत स्फोट झाला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, साक्षीदारांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे मृतांची संख्या अद्याप दिलेली नाही. याशिवाय कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

बॉम्बस्फोटामागील कारण अद्याप समजू शकले नसून हा आत्मघातकी हल्ला असल्याचे मानले जात आहे. 13 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार ताब्यात घेतले. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट-खोरासन म्हणजेच इसिस-के जबाबदार असल्याचे मानले जाते. इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेची ही अफगाणिस्तान स्थित शाखा आहे. जे देशातील अल्पसंख्याक शिया मुस्लिमांना सतत लक्ष्य करत आहे. हेही वाचा ब्राजीलचे राष्ट्रपती Jair Bolsonaro यांचा लसीकरणाला विरोध, केले 'हे' मोठे विधान

कारी सईद खोस्ती म्हणाले की, उत्तरेकडील कुंदुज शहरातील शिया मशिदीवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्याच्या काही दिवसांनंतर झालेल्या स्फोटाचा तपशील अधिकारी गोळा करत आहेत. तर प्रांतीय परिषदेचे माजी सदस्य नेमतुल्लाह वफा म्हणाले की, इमाम बर्गह मशिदीत स्फोट झाला आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली पण मृत आणि जखमींच्या संख्येची त्वरित पुष्टी नाही.

याआधी शुक्रवारी शुक्रवारच्या नमाज दरम्यान उत्तरेकडील कुंदूर शहरातील मशिदीमध्ये बॉम्ब हल्ला झाला होता. ज्यात कमीतकमी 50 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ऑगस्टमध्ये अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला होता.