Fishing Boat Capsizes | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Boat Capsize in Mauritania: मॉरिशसच्या तटरक्षक दलाने दक्षिण-पश्चिम मॉरिटानिया (Mauritania) मधील नडियागोजवळ 89 बेकायदेशीर स्थलांतरितांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मॉरिटानियाच्या किनाऱ्याजवळ त्यांची बोट उलटली (Boat Capsize). हे सर्व प्रवासी अटलांटिक महासागरापासून चार किलोमीटर अंतरावर अडकलेल्या मासेमारीच्या बोटीवर होते, असे सांगण्यात येत आहे. मॉरिशसच्या तटरक्षक दलाने पाच वर्षांच्या मुलीसह नऊ जणांची सुटका केल्याचे अहवालात म्हटले आहे. या बोटीमध्ये 170 प्रवासी होते, जे सहा दिवसांपूर्वी सेनेगल-गांबिया सीमेवरून युरोपला रवाना झाले होते.

अलीकडेच, काही दिवसांपूर्वी येमेनमधील एडनजवळील समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी दुर्घटना घडली. येथे बोट बुडाल्याने 49 जणांचा मृत्यू झाला असून 140 लोक बेपत्ता झाले होते. हे सर्व स्थलांतरित हॉर्न ऑफ आफ्रिकेतून आले होते. याबाबत स्थानिक अधिकारी व लोकांनी माहिती दिली होती. (हेही वाचा -Magic Durandal Sword Disappears: प्रख्यात ड्युरंडल तलवार फ्रेंच शहरातून रहस्यमयपणे गायब; 1,300 वर्षांहून अधिक काळ अडकली होती दगडात)

दरवर्षी हजारो आफ्रिकन स्थलांतरित सौदी अरेबियाला जाण्यासाठी पूर्वेकडील मार्गाने लाल समुद्र येमेन पार करण्याचा प्रयत्न करतात. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात उपासमार आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. हे सर्व स्थलांतरित चांगले काम आणि चांगल्या आर्थिक संधींच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.

याआधी अफगाणिस्तानमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. नदी ओलांडताना एक बोट उलटली होती. त्यामुळे सुमारे 20 जणांना जीव गमवावा लागला होता.