Photo Credit - X

42 Dead As Kenya Dam Bursts : केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमधील धरण फुटल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 42 नागरिकांचा मृत्यू (Dead) झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.नाकुरू काउंटीमधील माई महियूजवळ हे धरण फुटले (Kenya dam burst)आहे. बरेचसे रस्ते वाहून गेल्याने बचावकर्त्यात अनेक अडथळे येत आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिखलातून आत्तापर्यंत अनेकांना काढण्यात आले आहे," असे नाकुरूचे गव्हर्नर सुसान किहिका यांनी सांगितले.(हेही वाचा :Kidnapped Judge in Pakistan: पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या न्यायाधीशाची सुखरूप सुटका; घटनास्थळावरून वाहन जप्त )

सोमवारच्या धरणाच्या पडझडीने गेल्या काही दिवसांतील एकूण मृतांची संख्या 120 वर गेली आहे. एल निनो हवामान पद्धतीमुळे पूर्व आफ्रिकेत नेहमीपेक्षा जास्त पाऊस सध्या पडत आहे.दुर्घटनाग्रस्त भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, केनिया रेड क्रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी आणखी एक घडलेल्या दुर्घटनेत पूर्व केनियामधील पूरग्रस्त ताना नदीच्यामध्ये प्रवासी घेऊन जाणारी बोट उलटल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. तर, 23 जणांना वाचवण्यात आले आहे.