Kenyan serial killer: केनियामधून थरकाप उडवणारी घटना उधडकीस आली आहे. एका सीरियल किलरने (Kenyan serial killer)42 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचा खून केला आहे. त्यांचा खून ही साध्या पद्धतीने नाही तर, कुऱ्हाडीने वारकरून खून केला आणि नंतर मृतदेह खाणीत कचऱ्यात फेकून द्यायचा. विशेष म्हणजे मृतांमध्ये त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. पत्नीलाही त्याने सोडलं नाही. जोमाइस खालिसिया (Jomaisi Khalisiya) असे त्याचे नाव आहे. तो 33 वर्षाचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सर्व मृत तरुणी 18 ते 30 वयोगटातील तरुणी होत्या. तरुणींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाले आहेत. मात्र हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
2022 पासून तो महिलांची अशी निघृण हत्या करत आहे. गुरुवारपर्यंत त्याने 42 तरुणींच्या हत्या केल्याची कबुली दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी आरोपी सीरियल किलरला अटक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर केनिया शहरा सह जगभरात खळबळ उडाली. आरोपी हा खून करून मृतदेह राजधानी नैरोबीतील मुकुरू खाणीत फेकून द्यायचा. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात येत आहेत.
त्याने या सर्व मृत तरुणींना प्रेमाचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेले आणि त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह खाणीत फेकून दिले. धक्कादायक म्हणजे आरोपीचे घर खाणीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होतं. मात्र, कोणालाच कधी त्याच्यावर संशय आला नाही. तपासात पोलिसांना आरोपींकडून 10 फोन, महिलांचे कपडे, लॅपटॉप आणि ओळखपत्रे आढळले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत.