Afghanistan Mazar-e-Sharif Blast: अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत 4 स्फोट; 18 जणांचा मृत्यू
Afghanistan Mazar-e-Sharif Blast (PC- Twitter)

Afghanistan Mazar-e-Sharif Blast: अफगाणिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. येथील मजार-ए-शरीफ (Mazar-e-Sharif) मशिदीत स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झाले आहेत. मशिदीत 4 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाले आहेत. मजार-ए-शरीफची प्रसिद्ध मशीद सेह डेकन गजबजलेल्या भागात आहे आणि याच ठिकाणी हा स्फोट झाला. याशिवाय अन्य तीन ठिकाणी (नांगरहार, काबूल आणि कुंदूज) बॉम्बस्फोट झाले आहेत.

मजार-ए-शरीफच्या मशिदीमध्ये भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये 18 लोक ठार झाले तर 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - Kabul Explosion: काबूलमध्ये शाळेत 3 बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी)

अबू अली सिना बाल्की जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख घोसुद्दीन अन्वारी यांनी सांगितले की, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींचा नेमका आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला असून जखमींची संख्या नंतर अपडेट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या नांगरहारमध्ये झालेल्या स्फोटात चार जवानांचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप जीव गेले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत.