Indian Womens Killed In Horrific Accident: अमेरिकेत गुजरातमधील 3 महिलांचा मृत्यू; झाडाला धडकण्यापूर्वी 20 फूट हवेत उडाली कार, पहा व्हिडिओ
Indian Womens Killed In Horrific Accident (PC - X/@wyffnews4)

Indian Womens Killed In Horrific Accident: अमेरिकेत एका भीषण कार अपघातात (Car Accident) गुजरात (Gujarat) मधील तीन महिलांचा मृत्यू झाला. रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल या तीन महिला गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील रहिवासी होत्या. ग्रीनविल काउंटी, दक्षिण कॅरोलिना येथे त्यांची SUV पुलावरून खाली पडल्याने या महिलांचा मृत्यू झाला. ग्रीनविले काउंटी कॉरोनर ऑफिसच्या अहवालानुसार, SUV ने I-85 वर उत्तरेकडे प्रवास करताना सर्व लेन ओलांडली. नंतर कार रेलिंगवरून गेली आणि पुलाच्या विरुद्ध बाजूच्या झाडांना आदळण्यापूर्वी किमान 20 फूट हवेत उडाली.

चीफ डेप्युटी कोरोनर माईक एलिस यांनी डब्ल्यूएसपीए या वृत्तवाहिनीला सांगितले की, चालक पोस्ट केलेल्या वेग मर्यादेपेक्षा जास्त गाडी चालवत होता. या रस्त्यावरील अपघातात अन्य कोणत्याही कारचा सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही टक्कर किती भीषण होती याचा अंदाज या कारने सुमारे 20 फूट हवेत उडी मारली यावरूनच लावता येईल. (हेही वाचा -India-Bound Oil Tanker Hit By Missiles In Red Sea: भारतात येणाऱ्या जहाजावर लाल समुद्रात हुथी बंडखोरांचा क्षेपणास्त्र हल्ला; जहाजाचे नुकसान)

पहा व्हिडिओ - 

या अपघातात कारमध्ये बसलेल्या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देताना चीफ डेप्युटी कोरोनर माइक एलिस यांनी सांगितले की, कार खूप वेगाने चालवली जात होती. गाडी निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने चालवली जात होती. या घटनेत अन्य कोणत्याही कारचा सहभाग नसल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा -Indian Students Dies In America: अमेरिकेतील ॲरिझोना येथे कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू)

माईक एलिसने असेही सांगितले की, कार एका झाडाला लटकलेली आढळली जीचे अनेक तुकडे झाले होते. ज्याचा पुरावा आहे की कार अतिशय वेगाने चालवली जात होती. अपघातात वाचलेला एकमेव व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.