Indian-origin Woman Dies In Melbourne: मेलबर्नहून नवी दिल्लीला येणाऱ्या क्वांटास विमानात 24 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Indian-origin Woman Dies In Melbourne: मेलबर्न (Melbourne) हून दिल्लीला जाणाऱ्या क्वांटास फ्लाइटमध्ये 24 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणीचा विमान उड्डाण करण्यापूर्वीच मृत्यू झाला. मनप्रीत कौर असं या तरुणीचं नाव आहे. शेफ बनण्याची स्वप्ने पाहणारी मनप्रीत कौर चार वर्षांत प्रथमच आपल्या कुटुंबाला भारतात भेटण्यासाठी उत्साहित होती. अहवालानुसार, फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी मनप्रीतला अस्वस्थ वाटले. परंतु, ती कोणत्याही अडचणीशिवाय विमानात चढण्यात यशस्वी झाली.

मात्र, तिने सीटबेल्ट लावण्याचा प्रयत्न केला असता ती खाली कोसळली आणि लगेचच तिचा मृत्यू झाला. विमान मेलबर्नच्या बोर्डिंग गेटवरच होते, तेव्हा केबिन क्रू आणि आपत्कालीन सेवा तिच्या मदतीसाठी धावल्या. (हेही वाचा -Badminton Player Dies on Court: सामना खेळताना कोर्टवर कोसळला, 17 वर्षीय चिनी बॅडमिंटनपटूचा मृत्यू; PV Sindhu कडून दु:ख व्यक्त)

मनप्रीत कौरचा मित्र गुरदीप ग्रेवाल याने हेराल्ड सनला सांगितले की, जेव्हा ती विमानात चढली, तेव्हा तिला सीटबेल्ट लावल्यानंतर धडधड होत होती. News.com.au या वृत्तानुसार, फ्लाइट सुरू होण्यापूर्वीच ती तिच्या सीटसमोर पडली आणि तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा - US Shooting: किराणा दुकानात दरोडा, गोळीबारात भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू, अमेरिकेतील घटना)

मृत्यूचे कारण क्षयरोग असल्याचे मानले जाते, हा एक संसर्गजन्य रोग आहे जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. यापूर्वी परदेशात भारतीय विद्यार्थ्याची वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.