US Shooting: किराणा दुकानात दरोडा, गोळीबारात भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू, अमेरिकेतील घटना
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

US Shooting: अमेरिकेतील टेक्सास राज्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका किराणा दुकानामध्ये दरोडा टाकत असताना गोळीबाराची (Firing) घटना घडली आहे. या घटनेत एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ही घटना 21 जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांचा (Police) तपास सुरु आहे. (हेही वाचा- रशियाचा युक्रेनमधील खार्किव शहरात बॉम्ब हल्ला, महिला थोडक्यात बचावली)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डॅलसमधील प्लेझंट ग्रोव्हमधील गॅस स्टेशन सुविधा स्टोअरमध्ये ही घटना घडली. दुकानात चोरी करत असताना अनेक ग्राहक उपस्थित होते. चोरट्यांनी गोळीबार सुरु केला आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. दरोडेखोरांनी एकावर गोळीबार केला. या गोळीबारच्या घटनेत भारतीय वंशाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला.

त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु त्याचा मृत्यू झाला. मृत झालेल्या व्यक्तीचा ओळख गोपीकृष्ण असं आहे. तो आठ महिन्यांपूर्वीच अमेरिकेत आला. तो आंध्र प्रदेशातील बापटला जिल्हातील रहिवासी होता. या घटनेनंतर गोपीकृष्ण यांच्या कुटुबींयांनी शोक व्यक्त केला आहे. " वाणिज्य दूतावास, भारतीय संघटनांच्या समर्थनासह, शवविच्छेदन आणि मृत्यू प्रमाणपत्रांसह स्थानिक औपचारिकतेनंतर गोपीकृष्णाचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी सर्व शक्य मदत पुरवत आहे अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे. गोपीकृष्ण यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.