Missing from US PC TWITTER

Indian Student Missing from US: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या आठवड्यापासून २३ वर्षीय भारतीय विद्यार्थी बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी तिला शोधण्यासाठी पथक नेमले आहे. सोबत ओळखीच्या लोकांची मदत घेतली आहे. २८ मे पासून ती बेपत्ता झाली होती. नितीशा कंदूला असं बेपत्ता झालेल्या तरुणीचे आहे.ती शेवटची लॉस एंजेलिसमध्ये दिसली होती अशी माहिती पोलिसांना आहे.  (हेही वाचा- पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार,  सीएसयूएसबीचे पोलिस प्रमुख जॉन गुटिएरेझ यांनी रविवारी X वर पोस्ट शेअर केली. लिहलेल्या पोस्टमध्ये तरुणीने वर्णन केले आहे. नितीशा कंदूला विषयी माहिती असलेल्या लोकांनी 909) 537-5165 वर संपर्क साधा असं सांगितले आहे. ती कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी सॅन बर्नोर्डिनो येथील विद्यार्थींनी आहे. नितीशा ही मुळची हैद्राबार येथील रहिवासी आहे.सीएसयूएसबीचे पोलिस तीच्या कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिस बेपत्ता झालेल्या नितीशाचा शोध घेत आहे. तिच्या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. नितीशाच्या बेपत्ता झालेल्या घटनानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेत गेल्या महिन्यात, भारतीय विद्यार्थी रुपेश चंद्र चिंताकिंडी (२६) शिकागो येथून बेपत्ता झाला.  मोहम्मग अब्दुल अरफाथ २५ जो मुळचा हैद्राबादचा होता, मार्चमध्ये बेपत्ता झाल्यानंतर क्लीव्हलॅंडमध्ये मृतावस्थेत सापडला होता.