Mahsa Amini (Photo Credits: ANI)

Shocking! इराणमध्ये मेहसा अमिनी (Mahsa Amini) या 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी हिजाब (Hijab) न घातल्यामुळे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून झालेल्या मारहाणीनंतर ही तरुणी कोमात गेली. जिथे तिचा मृत्यू झाला. इराण (Iran) मध्ये, नैतिकतेच्या आधारावर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर महसा अमिनी कोमात गेल्याने सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता.

अल जझीराच्या वृत्तानुसार, 22 वर्षीय महसा अमिनी आपल्या कुटुंबासह तेहरानला जात होती. यादरम्यान हिजाब न घातल्याने पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आला. महसाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा -शारीरिक सुख नव्हे तर शांततेच्या शोधात सौदी अरेबियातील व्यक्तीने 43 वर्षात केले 53 वेळा लग्न)

मृताच्या कुटुंबीयांशी बोलणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सांगितले की, पोलिसांनी अमिनीला पकडले आणि तिला पोलिसांच्या वाहनात नेण्यास भाग पाडले. आपल्या बहिणीला पोलिसांनी अशा प्रकारे घेऊन जाण्यास तिचा भाऊ कियारश याने आक्षेप घेतला. पण, पोलिसांनी त्याला सांगितले की, ते त्याच्या बहिणीला तासभर पोलीस ठाण्यात घेऊन जात आहेत. बहिणीच्या सुटकेसाठी त्याचा भाऊ पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबला होता. थोड्याच वेळात एक रुग्णवाहिका त्याच्या बहिणीला रुग्णालयात घेऊन जात होती. पोलिसांनी दिलेल्या युक्तिवादाबद्दल विचारले असता महशाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती पूर्णपणे बरी होती. तिला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या नव्हती. ती आमच्यासोबत तेहरानला जात होती, तिला अचानक हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो.

मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, "महसा अमिनी या 22 वर्षीय महिलेचा कोठडीत मृत्यू झाल्याची घटना, कोठडीतील छळ आणि इतर अत्याचाराचा समावेश असलेल्या परिस्थितीत फौजदारी चौकशी केली पाहिजे." अल जझीराने सोशल मीडियावर दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी अंतर्गत मंत्र्यांना चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संसदेत हे प्रकरण मांडणार असल्याचे येथील खासदारांनी सांगितले आहे. तर न्यायव्यवस्थेने तपासासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.