1MDB Scandal: मलेशियाचे माजी पंतप्रधान Najib Razak भ्रष्टाचाराच्या 7 खटल्यांमध्ये दोषी; सरकारी फंडामध्ये झाला होता कोट्यावधी डॉलर्सचा घोटाळा
Former Malaysian PM Najib Rajak. (Photo Credit: PTI/File)

सरकारी गुंतवणूकीतील घोटाळा (1MDB Scandal) प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या पहिल्या खटल्यात, मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक (Former Malaysian Prime Minister Najib Razak) यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नवीन सत्ताधारी युतीत नजीब यांचा पक्ष प्रमुख सहयोगी पक्ष म्हणून दाखल झाल्यानंतर पाच महिन्यांनंतर हा निर्णय देण्यात आला आहे. अब्जावधी डॉलर्सच्या घोटाळ्याबद्दल लोकांच्या रोषामुळे नजीब यांच्या पक्षाला 2018 मध्ये सत्तेबाहेर पडावे लागले होते. न्यायाधीश मोहम्मद नजलान गजाली यांनी 2 तास आपला निकाल वाचल्यानंतर म्हटले की, 'मी आरोपींना सर्व अशा 7 आरोपांबाबत दोषी मानले आहे.' विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या निर्णयाचा नजीबच्या इतर खटल्यांवर परिणाम होईल.

तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी, मलेशियाची कायदे व्यवस्था आणखी बळकट झाल्याचे संकेत व्यावसायिक समुदायाला मिळतील. नजीब यांनी पुढे अपील करण्याबाबत सांगितले आहे. ते म्हणतात की, चतुर बँकर्सनी त्यांना चुकीचा मार्ग दाखवला व त्यांच्यावरील खटला राजकीय आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिले - 'पहिल्या दिवसापासून मी म्हटलेले आहे की माझ्या नावावरचा डाग हटविण्याची ही संधी आहे ... त्यानंतर आता आम्ही न्यायालयात दाद मागू, मी तयार आहे.' सात वेगवेगळ्या खटल्यांमध्ये नजीब 42 आरोपांना तोंड देत आहेत आणि यामध्ये त्यांना कित्येक वर्षांची शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण)

सध्याच्या खटल्यात, सत्तेचा गैरवापर केल्याचा एक आरोप, विश्वास भंग करण्याचे तीन फौजदारी आरोप आणि सावकारीच्या तीन आरोपांचा समावेश आहे. 2009 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर नजीब यांनी मलेशियाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी, एक एमडीबी फंड स्थापन केला होता. या फंडामधूनच कोट्यवधी डॉलर्सच्या हेरफेरचा आरोप आहे. सध्याच्या मलय राष्ट्रवादी युतीमध्ये, नजीबचा पक्ष प्रमुख सहयोगी आहे. मार्चमध्ये मुहयद्दिन यांच्या पक्षाने आधीच्या सुधारवादी सरकारची सत्ता उलथून टाकल्यानंतर ही युती स्थापन करण्यात आली होती.