नोकरी मिळवण्यासाठी 13 वर्षीय मुलाने Apple ला दुसऱ्यांदा केले हॅक
प्रातिनिधिक प्रतिमा (Image: PTI)

नोकरी मिळवण्यासाठी एका 13 वर्षीय ऑस्ट्रेलियन (Australian) मुलाने जगप्रसिद्ध कंपनी अॅपलला (Apple)  हॅक केले आहे. तर हा प्रकार मुलाने दुसऱ्यांदा पुन्हा केला आहे. तर अटक केल्यानंतर मला नोकरी मिळावी म्हणून हॅक केले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच जर अॅपलला हॅक केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता आहे असे सुद्धा या मुलाला वाटले होते.

अॅपल कंपनीसाठी हाय सिक्युरिटी आणि अॅडवान्स प्रोटोकॉल हॅक करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र अद्याप हा 13 वर्षीय मुलगा कोण? त्याचे नाव काय? याबद्दल उघड झालेले नाही. परंतु याच मुलाने यापूर्वीसुद्धा अॅपलला हॅक केले असल्याचे सांगितले जात आहे.

(इंस्टाग्राम पोल वर फॉलोअर्सनी दिलेला सल्ला ऐकून 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या)

मात्र मुलाच्या वकिलांनी तो फक्त 13 वर्षीय असून फक्त नोकरी मिळवण्यासाठी त्याने हा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. परंतु कोर्टाने या मुलाला कोणताही शिक्षा दिली असून त्याच्याजवळ असणाऱ्या कौशल्यांचा योग्य वापर करावा अशी समज दिली आहे.