इंस्टाग्राम पोल वर फॉलोअर्सनी दिलेला सल्ला ऐकून 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

सोशल मीडियासाठी (Social Media Craze) तरुणाईची आणि त्यातही किशोरवयीन मुलांची क्रेझ आजवर वेळोवेळी पाहायला मिळाली आहे. मात्र सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मलेशियातील (Malaysia)एका मुलीने फॉलोअर्सचा सल्ला ऐकून चक्क आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मानसिक तणावाने त्रासलेल्या एका 16 वर्षीय मुलीनी इंस्टग्राम पोल (Instagram Poll) पोस्ट करत आपल्या फॉलोअर्सना मी जगावं की मरावं असा सवाल केला आणि इतकंच नव्हे तर त्यावर 69 टक्के लोकांनी मरण्याचा सल्ला दिल्यावर एका दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (Suicide)केल्याने सध्या संपूर्ण देशात सोशल मीडियाच्या वापरावर टीका होताना दिसून येतेय.  नागपूर : ऑनलाईन खेळाच्या अधीन झालेल्या 17 वर्षीय मुलीची आत्महत्या !

सरावाक पोलिसांच्या माहितीनुसार 13 मे रोजी या तरुणीने इंस्टग्राम वर एक पोल पोस्ट केला होता ज्यात "हे खूप महत्वाचं आहे, मला D/L मध्ये निवडायला मदत करा'" असे म्हंटले होते. तसेच या मुलीने मला आयुष्याचा कंटाळा आल्याने जीव द्यावासा वाटतोय असा आशयाची एक पोस्ट फेसबुकवर देखील केली होती.

या मुलीच्या एका मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे D/L या पर्यायाचा अर्थ म्हणजे डेथ/लाईफ असा होतो. या मुलीच्या फॉलोअर्सनी कदाचित गंमतीतच डेथ हा पर्याय निवडला पण या मुलीने खरच जीव दिल्यामुळे आता या फॉलोअर्सना आत्महत्येला प्रोत्साहन दिल्याचा नक्कीच पश्चाताप होत असणार, असे मत पेनांगचे एमपी आणि वकील रामकरपाल सिंग यांनी मांडले आहे. व्हिडिओ कॉलिंगद्वारे फाशीचे प्रशिक्षण देताना तरुणाचा मृत्यू

या मुलीच्या फॉलोअर्सनी जर का तू जगावंस असा सल्ला दिला असता तर मुलीचा जीव वाचला असता का? नेटवरच्या लोकांनी जगायचा सल्ला दिल्यावर या मुलीने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायचा विचार केला असता का? नेटकऱ्यांचा सल्ला ऐकून जीव देणाऱ्या मुलीची जिथली चूक आहे तितकीच चूक ही आत्महत्याला प्रोत्साहन देणाऱ्या नेटकऱ्यांची देखील आहे,मलेशियन कायद्याच्या अनुसार हा एक गुन्हा असून यासाठी 20 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते असेही रामकरपाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.या सोबतच मलेशियाचे युथ आणि क्रीडामंत्री सैद सादिक अब्दुल रेहमान यांनी देशातील नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली आहे.