Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ऑनलाईन खेळाच्या अधीन झालेल्या एका 17 वर्षीय मुलीने नागपुरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळाच्या चॅलेंजचा एक भाग म्हणून आत्महत्या असते. अंतिम टप्प्यावर खेळाडूने हाताची नस कापून किंवा उंच इमारतीवरून उडी मारून आपला जीव संपवायचा असतो. ऑनलाईन खेळ आणि चॅलेंजच्या अधीन झालेल्या मानसी जोनवाल या मुलीच्या हातावर "Cut here to Exit" असं लिहिल्याचं आढळलं आहे. ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन मानसीने आपला जीव गमावला.

मानसीचे वडील मध्ये एअरफोर्समध्ये हवालदार आहेत. पसंतीचे कॉलेजचे न मिळाल्याने मानसी घरीच असायची. तिने शिक्षणातून वर्षभराचा ब्रेक घेतला होता. मानसीच्या पालकांनी तिला बाहेर पाठवण्याचा, खेळायला जाण्यासाठी घराबाहेर पाठवण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र मानसी घरातच ऑनलाईन खेळामध्ये गुंतली. मानसीच्या हातावरील संदेश पाहता ती ब्लु व्हेल (Blue Whale Challenge) किंवा मोमो चॅलेंज (Momo Challenge) खेळत असल्याचे कयास लावण्यात आले आहेत.

मानसीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. ही घटना नागपूरच्या नरेंद्र नगर परिसरात घडली आहे.  भारतामध्ये ब्लु व्हेल खेळावर बंदी घालण्यात आली आहे. जोनवाल कुटुंबामध्ये कोणतीच सुसाईट नोट सापडली नाही.