Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
38 minutes ago

Viral Video: ग्वाल्हेर जिल्ह्यात शासकीय शाळेत दोन शिक्षकांमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Videos Shreya Varke | Sep 25, 2024 05:12 PM IST
A+
A-

Viral Video: शाळेला शिक्षणाचे मंदिर म्हटले जाते, पण काही वेळा शिक्षण घेणाऱ्या मुलांसमोर शिक्षक असे प्रकार करतात की त्यामुळे ते मुलांच्या नजरेतुनही पडतात. ग्वाल्हेर येथील एका शाळेत दोन शिक्षिकामध्ये जोरदार मारामारी झाली. दरम्यान शिक्षलाने पायातली चप्पल काढून महिला शिक्षिकेला मारहाण केली, त्यानंतर दुसऱ्या महिला शिक्षिकेनेही शिक्षिकावर हात उचलला. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्वाल्हेर जिल्ह्यातील अदुपुरा येथील मध्यवर्ती सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका पुरुष शिक्षिकाने महिला शिक्षिकेला धक्काबुक्की केली आणि यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडत असताना दोघेही खोलीत पोहोचले,  विद्या रतुरी असे या महिला शिक्षिकेचे नाव असून त्या प्राथमिक शिक्षिका आहेत, तर शिशुपाल सिंग हे जदौन मिडल स्कूलमध्ये शिकवतात. हे देखील वाचा: Siddhivinayak Mandir Viral Video: मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याच्या वायरल व्हिडिओ वर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया; 'प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न म्हणत आरोप फेटाळले (Watch Video)

दोन शिक्षकांमध्ये मारामारी

महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, पुरुष शिक्षक वॉशरूममध्ये जाताना तिचे व्हिडिओ बनवतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या व्हिडिओच्या आधारे दोघांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून शाळेत वाद सुरू होता. शिक्षक शाळेत उशिरा येतात, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत.

RELATED VIDEOS