Photo- @ManojSh28986262/X

Viral Video: भारताने पाकिस्तानलाचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये  6 गडी राखून पराभूत केले आहे. या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ ांची प्रचंड निराशा झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानी मीडियाचा एक विचित्र दावा व्हायरल होत आहे, ज्यात पॅनेलिस्ट म्हणत आहेत की, भारताने जिंकण्यासाठी 22 ज्योतिषींच्या मदतीने काळा जादू केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक त्याची खिल्ली उडवत आहेत. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या पॅनेलिस्टने व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, भारतीय संघाने दुबई स्टेडियममध्ये 22 पंडित पाठवले होते, जे प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूवर काळाजादू करत होते.

येथे पाहा व्हिडीओ:

एका व्यक्तीने दावा केला की, भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवस आधी 7 पुजाऱ्यांना विशेष प्रार्थनेसाठी मैदानात पाठवले होते. या विचित्र दाव्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि विनोदी कमेंट्सचा पाऊस पडला. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी '२२ पुजाऱ्यांच्या टीम'बद्दल मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली.