मुंबई मध्ये सिद्धिविनायक मंदिरामधील लाडवांच्या प्रसादात उंदराचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. सोशल मीडीयात सध्या हा व्हिडिओ वायरल होत असल्याने मंदिरातील प्रसादात किती साफ सफाई ठेवली जाते? याबद्दल प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान यावर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष (Chairperson of Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust) सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आरोप फेटाळत हा प्रकार प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने केल्याचं म्हटलं आहे.
सिद्धिविनायक मंदिराकडून माहिती देताना सदा सरवणकर यांनी या व्हिडिओ चा तपास केला जाईल पण हा व्हिडिओ मंदिरातील नाही. व्हिडिओ मध्ये दिसत असलेलं ठिकाण मंदिरातील नाही असं म्हटलं आहे. तसेच लाडू बनवण्यासाठी 25 कर्मचारी काम करत असतात. दिवस आणि रात्रीची शिफ्ट असते. या ठिकाणी अस्वच्छ्ता असते. सुरक्षा आणि स्वच्छतेचे सारे प्रोटोकॉल सांभाळले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उत्तम पदार्थ
सदा सरवणकर यांनी प्रसादामध्ये उच्च दर्जाचे आणि स्वच्छ घटक वापरले जात असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये प्रिमियम दर्जाचे तूप असतं. प्रसादातील सार्या घटकांना प्रयोगशाळेत तपासलं जातं तसेच यावर 3 सरकारी अधिकार्यांच्या देखरेखीत काम चालतं
#WATCH | Mumbai: Sada Sarvankar, Shiv Sena leader & Chairperson of Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust (SSGT) says, "The place where prasad of Lord Ganesh is prepared here is very neat and clean. We make all efforts to keep it very clean. Ghee, cashew and whatever else goes… pic.twitter.com/65p89KUwiL
— ANI (@ANI) September 24, 2024
पहा वायरल व्हिडिओ
BREAKING: Video shows mice over prasad at Mumbai's Shree Siddhivinayak Temple. #SiddhivinayakTemple pic.twitter.com/Hx8BJw22vh
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 24, 2024
सिद्धिविनायक मंदिराचं लवकरच रूप पालटलं जाणार आहे. त्याची घोषणा झाल्यापासून अनेकांनी बदनामीची कारस्थानं रचली आहेत. असा आरोप मंदिराच्या ट्रस्ट ने केला आहे. Tirupati Laddu Prasadam Row: तिरुपती लाडू विवादानंतर मंदिराचे झाले शुध्दीकरण; आवारात 4 तास चालला महाशांती यज्ञ (Video).
देशात सध्या तिरूपती बालाजी मंदिरामधील प्रसादाचा वाद सुरू असताना आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा देखील व्हिडिओ वायरल झाल्याने अनेक भाविकांच्या मनात द्विधा स्थिती झाली आहे.