UKRAINE-RUSSIA Tensions:वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिकांना युक्रेन देश सोडण्याचे दिले आदेश
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की रशियाच्या संभाव्य आक्रमणावरून वाढत्या तणावामुळे भारतीय नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी कोणत्याही उपलब्ध पर्याय जसेकी व्यावसायिक किंवा चार्टर फ्लाइटचा लवकरात लवकर शोध घ्यावा. असे भारतीय दुतावासाने सांगितले आहे.