Putin's Luxury Car Explodes: द सनच्या वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अधिकृत कार ताफ्यातील एका आलिशान लिमोझिन (Limousine) मध्ये मोठा स्फोट (Blast0 झाला. मध्य मॉस्कोमधील घटनेमुळे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत आणि क्रेमलिनमधील अंतर्गत धोक्यांबद्दल शंका वाढल्या आहेत. पुतिन यांची महागडी कार लुब्यांका येथील एफएसबी मुख्यालयाजवळ जळताना दिसली.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग इंजिनमधून सुरू झाली आणि नंतर गाडीच्या आत पसरली. घटनेच्या वेळी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेले लोक अग्निशमन दलाच्या जवानांच्या आगमनापूर्वी मदतीसाठी बाहेर आले. व्हायरल व्हिडिओमध्ये गाडीतून काळा धूर येत असल्याचे आणि गाडीच्या मागील भागाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. स्फोटामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. तसेच घटनेच्या वेळी गाडीत कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा - Myanmar, Bangkok Earthquake Death Toll: म्यानमार-बँकॉक भूकंपातील मृतांची संख्या 1,644 वर, 3,400 जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू)
व्हिडिओ पहा -
JUST IN: 🇷🇺 Luxury limousine from Russian President Putin's official motorcade exploded on the streets of Moscow, just blocks from the FSB headquarters.
It's unclear if this is an attempted ass*ssination attempt pic.twitter.com/Da4tcUoZEU
— BRICS News (@BRICSinfo) March 29, 2025
झेलेन्स्की यांनी केलं होत भाकीत -
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची प्रकृती बिघडत चालली असून ते लवकरच मरतील असा मोठा दावा केला होता. बुधवारी एका मुलाखतीदरम्यान झेलेन्स्कीचे हे भाकित समोर आले. कीव इंडिपेंडेंट वेबसाइटनुसार, झेलेन्स्की यांनी युरोव्हिजन न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की पुतिन लवकरच मरतील.