MEA spokesperson Randhir Jaiswal (फोटो सौजन्य - ANI)

Russia-Ukraine Conflict: रशिया-युक्रेन संघर्षात (Russia-Ukraine Conflict) रशियासाठी लढणाऱ्या एकूण 126 भारतीयांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16 भारतीय बेपत्ता आहेत. यासंदर्भात शुक्रवारी साप्ताहिक माध्यम पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे (Ministry of External Affairs) प्रवक्ते रणधीर जयस्वाल (MEA Spokesperson Randhir Jaiswal) यांनी माहिती दिली. जयस्वाल यांनी सांगितले की, यातील 96 जण परतले आहेत तर 18 जण अद्याप भारतात परतलेले नाहीत.

रशियन सैन्यात आघाडीवर लढताना मृत्युमुखी पडलेल्या केरळच्या 32 वर्षीय बिनिल बाबू यांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जेणेकरून त्यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात परत येऊ शकेल. (हेही वाचा -Russia Ukraine War: युक्रेनचे रशियामध्ये अनेक ठिकणी ड्रोन हल्ले, मॉस्को परिसरात चार ड्रोन पाडले)

केरळमधील भारतीय नागरिकाचा मृत्यू -

परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सैन्यात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशात सोडण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'केरळमधील एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूची आम्हाला माहिती मिळाली आहे, जो रशियन सैन्यात भरती झाला होता. केरळमधील आणखी एक भारतीय नागरिक, जो अशाच प्रकारे भरती झाला होता, तो जखमी झाला असून तो मॉस्कोमधील रुग्णालयात उपचार घेत आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.' (हेही वाचा -Russia Ukraine War: 2 महिन्यांत रशियाने युक्रेनमध्ये हवाई हल्ले सुरू केल्याने 4 मुलांसह 25 जण ठार)

रशियन सैन्यात लढताना 12 भारतीय ठार - रणधीर जयस्वाल  - 

मॉस्कोमधील आमचा दूतावास कुटुंबियांच्या संपर्कात असून सर्व शक्य ती मदत केली जात आहे. मृतदेह लवकरात लवकर भारतात पोहोचवण्यासाठी आम्ही रशियन अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.