National Testing Agency कडून UGC-NET ची दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 20-30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे अशी माहिती युजीसी चे चेअरमॅन एम जगदीश कुमार यांनी दिली आहे. पूर्वी ही परीक्षा 12-14 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.