National Testing Agency कडून UGC-NET ची दुसर्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 20-30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे अशी माहिती युजीसी चे चेअरमॅन एम जगदीश कुमार यांनी दिली आहे. पूर्वी ही परीक्षा 12-14 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
एनटीए कडून पाहिल्या टप्प्यातील परीक्षा 9,11,12 जुलै दिवशी घेण्यात आली आहे. ही परीक्षा 33 विषयांसाठी असून 310 परीक्षा केंद्र आणि 225 शहरांमध्ये त्याचं आयोजन करण्यात आले होते. आता दुसर्या टप्प्यातील परीक्षा 12,13,14 ऑगस्टऐवजी 20 आणि 30 सप्टेंबरला 64 विषयांसाठी होणार आहे.
युजीसी- नेट परीक्षेचं अॅडमीट कार्ड विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड करू शकणार आहेत. यासाठी त्यांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख पोर्टलवर टाकून लॉगिन करावं लागणार आहे. CAT 2022: CAT परिक्षेच्या नोंदणीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कशी असेल नोंदणी प्रक्रीया.
कसं डाऊनलोड कराल तुमचं अॅडमीट कार्ड
- अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
- होमपेजवरील “Download Phase 2 Admit Card for UGC-NET Dec. 2021 and June 2022 (merged cycles) ),” वर क्लिक करा.
- आता लॉगिन करण्यासाठी अॅप्लिकेशन नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन समाविष्ट करुन सबमीट करा.
- UGC NET Phase 2 Admit Card 2022 आता तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
- यूजीसी नेट हॉल तिकीट आता तुम्ही डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता.
युजीसी- नेट परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्वरूपामध्ये होणार आहे. ही परीक्षा 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 12 आणि दुसरी शिफ्ट 3 ते 6 या वेळेत होणार आहे.